Astrology
6 उपाय : घराला गरिबी पासून वाचवू शकतात
वास्तू मध्ये बाथरूम घरातील सर्वात महत्वाच्या भागा पैकी एक आहे. घरामध्ये होणाऱ्या वास्तू दोषाचे कारण बाथरूम संबंधीत असू शकता. जर बाथरूम मध्ये यागोष्टीकडे लक्ष दिले गेले नाही तर समस्या होतात. जर तुमच्या घर-परिवारात देखील समस्या असतील तर बाथरूम संबंधीच्या या टिप्स तुमच्या कामी येऊ शकतात.
हे 6 उपाय : घराला गरिबी पासून वाचवू शकतात
नीळा रंग हा आनंद आणि शुभतेचे प्रतीक मानले गेले आहे. वास्तू मध्ये निळ्यारंगाला जास्त महत्व दिले जाते. वास्तूच्या अनुसार बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली ठेवणे शुभ मानले जाते. यागोष्टी लक्ष द्या की बाथरूम मध्ये ठेवलेली ही बादली खाली राहू नये. बादली नेहमी भरलेली असावी. असे केल्यामुळे सुख-शांती टिकून राहते.
जर बाथरूम मध्ये आरसा लावलेला असेल तर काळजी घ्या की तो दरवाज्याच्या अगदी समोर नसावा. जर दरवाज्याच्या ठीक समोर काच असल्यास त्याला आदळून निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येते.
ज्या घरामध्ये नळ सतत ठिपकत राहतो, तेथे धन कधी टिकत नाही. अश्या घरामध्ये नेहमी पैश्यांची कमी राहते. आर्थिक नुकसाना पासून वाचण्यासाठी यागोष्टीकडे लक्ष द्या.
बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवणे चांगले नसते. बाथरूम आणि बेडरूम मध्ये वेगवेगळ्या उर्जा असतात, ज्या आपसात संपर्कात आल्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
घरामध्ये होणारा पाण्याचा दुरुपयोग हा देखील वास्तू दोष होण्याचे कारण बनू शकते. जे धन आणि आरोग्याशी निगडीत समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे काळजी घ्यावी की पाण्याचा घरामध्ये कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होऊ नये.
किचन आणि बाथरूमचे नेहमी स्वच्छ असने आवश्यक आहे. यादोन्ही जागेवरून संपूर्ण घरामध्ये पॉजिटीव किंवा निगेटिव्ह एनर्जी पसरते. यासाठी बाथरूम आणि किचन नेहमी स्वच्छ ठेवावे.
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका
वाचा : ज्या घरामध्ये हे 5 काम होतात, तेथे पैसे नाही टिकत आणि येते गरिबी
