dharmik

बर्थ डे असो किंवा लग्न या 6 वस्तू पैकी एक वस्तू गिफ्ट म्हणून द्या

बर्थ डे असो किंवा लग्न आपण गिफ्ट देतो. बहुतेक वेळा रोख रक्कम किंवा एखादे शो-पीस किंवा सिनरी गिफ्ट मध्ये देतो. वास्तुशास्त्राचा विचार केला तर गिफ्ट हे स्पेसिफिक असले पाहिजे. काही अशी वस्तू जी घेणाऱ्याच्या फायद्याची असेल. वास्तु मध्ये अश्या काही वस्तू सांगितल्या आहेत ज्या गिफ्ट करणे आणि गिफ्ट म्हणून स्वीकारणे दोन्ही बाबतीत शुभ आहेत. हत्तीच्या मूर्ती पासून ते मातीच्या काही वस्तू पर्यंत 6 वस्तू आहेत ज्या गिफ्ट म्हणून उत्तम आहेत.

कोण कोणत्या आहेत त्या खास वस्तू

हत्तीची जोडी

कोणत्याही शुभ प्रसंगी हत्तीची जोडी देणे किंवा स्विकारणे अत्यंत शुभ आहे. हत्ती चांदी-सोने किंवा पितळ-लाकडी असला तरी चालेल. लक्ष्मीला हत्ती प्रिय आहे. यासाठी दिवाळीला गजलक्ष्मीची पूजा केली जाते. हत्तीची मूर्ती तिजोरी मध्ये ठेवल्याने बरकत येते.

सात घोडे

सात सफेद घोडे फेंगशुई आणि वास्तु दोन्ही मध्ये शुभ मानली जाते. सात सफेद घोड्यांचे शो-पीस किंवा फोटो गिफ्ट देणे किंवा घेणे यामुळे उत्पनाचे साधने वाढू शकतात.

दोन्ही बाजूला गणपती

अशी मूर्ती ज्याच्या दोन्ही बाजूला गणपती असतील अशी मूर्ती देणे किंवा घेणे शुभ फळ देते.  फोटोच्या बाबतीत लक्षात ठेवा दोन्ही बाजूला गणपतीचे मुख दिसले पाहिजे, पाठ नसावी. अश्या प्रकारची मूर्ती शुभ मानली जाते कारण गणपतीच्या पाठीचे दर्शन शुभ मानले जात नाही.

कपडे

लोकांना कपडे गिफ्ट म्हणून देणे किंवा घेणे चांगले मानले जाते. असे केल्यामुळे गिफ्ट देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचे दुर्भाग्य समाप्त होते आणि सौभाग्य वाढते.

माती पासून बनलेली कोणतीही वस्तू

माती पासून बनलेले कोणतेही शो-पीस देणे आणि घेणे शुभ मानले जाते. असे केल्याने अडकलेले धन हळूहळू मिळण्यास सुरुवात होते आणि उत्पन्नात वाढ होते. माती पृथ्वी तत्वाचे प्रतिक आहे.

वाचाश्रावणी सोमवारी हे खास उपाय केल्याने उत्पन्न वाढते आणि निरोगी जीवन मिळते

चांदीची कोणतीही वस्तू

शास्त्रामध्ये चांदी देणे किंवा घेणे मंगलमय मानले गेले आहे परंतु सोने देणे अशुभ आहे. चांदीचा सिक्का किंवा वस्तू देणे किंवा घेणे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button