astrology

6 सप्टेंबर पासून शनी बदलणार चाल, प्रत्येक राशीवर होणार परिणाम, जाणून घ्या तुमच्यासाठी शुभ का अशुभ फळ देणार

पुढील महिन्यात 6 सप्टेंबर रोजी गुरुवारी शनी आपली चाल बदलून मार्गी होणार आहे. याआधी शनी वक्री स्थिती मध्ये होता. शनी यावेळी धनु राशी मध्ये आहे आणि मार्गी झाल्यानंतर देखील याच राशीमध्ये राहणार आहे. वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मकर या राशीवर त्याचा अशुभ प्रभाव राहील. यामुळे यांना सांभाळून राहिले पाहिजे. शनीच्या या परिवर्तनाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल पाहू.

मेष : कार्यक्षेत्रात वेळ अनुकूल राहील. नोकरी बदलण्याची इच्छा असल्यास ही वेळ चांगली राहील. फायदा आणि यश दोन्ही मिळेल. बिजनेस मध्ये फायदा होईल. प्रोपर्टीच्या कामात फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. लोन घ्यावे लागू शकते पण वेळेत ते परत करू शकाल. सरकारी कामात सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. दुर्लक्ष करू नका. सांधेदुखी होऊ शकते. लिवर मध्ये समस्या होण्याची शक्यता आहे. इन्फेक्शन किंवा औषधाचे साईड इफेक्ट होऊ शकतात.

वृषभ : नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाच्या जागेत बदल होऊ शकतो. नोकरी बदलणार असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक निर्णय घेऊ नका. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. एखादे नवीन काम करू शकता, नवीन योजना बनवून त्यावर काम करू शकता. आर्थिक स्थिती मध्ये समस्या होऊ शकतात. इनकम वाढवण्यासाठी एक्स्ट्रा काम सुरु करू शकता. बेकायदा कामा पासून दूर रहा. डोळे, नाक, कान आणि गळा संबंधित त्रास होऊ शकतो. पोटाची समस्या देखील होऊ शकते. कोर्ट-कचेरीचा अंतिम निकाल येऊ शकतो.

मिथुन : पार्टनरशिप मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी वेळ चांगली नाही आहे. संयम ठेवल्यास फायदा होईल, अन्यथा समस्या वाढू शकतात. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या लोकांनी सावध राहिले पाहिजे. विनाकारण आरोप लागण्याची शक्यता आहे. आपल्या कार्य स्थानी मेहनत घेतल्याने मान-सन्मान वाढेल. काही बाबतीत आपल्या नशिबाची साथ मिळेल. काही चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित लोकांच्या विवाहामध्ये अजून उशीर होऊ शकतो. आरोग्य खराब होऊ शकते. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क : कामात समस्या येऊ शकतात. कर्जातून मुक्ती मिळू शकते. बिजनेस मध्ये स्पर्धकावर मात करता येऊ शकते. अधिकाऱ्या सोबत भांडण होऊ शकते. विनाकारण खर्च करणे टाळा. लोन संबंधीची कामे होतील. काही खास कामात उशीर होऊ शकतो. कुटुंबात काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. जीवनसाथी सोबत वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : नवीन बिजनेस करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना पार्टनरशिपची ऑफर मिळू शकते. धनलाभ होण्याच्या बाबतीत चिंतीत राहाल. धनलाभ होईल पण हळूहळू होईल. त्यामुळे संयम ठेवून कोणतेही काम करावे. प्रेम प्रसंगासाठी वेळ चांगली आहे. कामाच्या जागी मान-सन्मान वाढेल.

कन्या : घर बदले आणि नवीन जागी शिफ्ट होण्याचा विचार करू शकता. प्रवासाचे योग आहेत. रागावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतता मिळवण्यासाठी प्रयत्न करा. कर्ज काढण्याचे टाळावे. जोखीम घेऊ नका. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एक्स्ट्रा अफेयर पासून दूर राहा. संतान सुख मिळण्याचे योग आहेत.

तुला : साढेसाती पासून सुटका मिळेल. समस्यांपासून सुटका मिळेल. तुमच्यासाठी वेळ शुभ आहे. आपल्या मेहनतीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. कामाच्या बाबतीत सावध राहा. एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. लहान भाऊ-बहिणी कडून समस्या होऊ शकते. प्रवासाचे योग आहेत. धन लाभ होऊ शकतो. दैनंदिन खर्चात वाढ होऊ शकते. नोकरी आणि बिजनेस करणाऱ्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. थांबलेले पैशांची कामे मार्गी लागतील.

वृश्चिक : कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. नोकरी आणि बिजनेस मध्ये एक्स्ट्रा मेहनत घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. इनकम वाढ होऊ शकते. करियर मध्ये पुढे जाण्यासाठी संधी मिळू शकते. या दिवसात इनकम तर वाढेल पण बचत कमी होईल. दांपत्य जीवनात समस्या येऊ शकतात.

धनु : तुमच्या मेहनतीचे फळ दुसऱ्या कोणाला तरी मिळू शकते. मानसिक तणाव आणि समस्या वाढ होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. काम जास्त असल्याने टेन्शन वाढू शकते. विचार न करता बोलण्यामुळे काम बिघडू शकते. आरोग्याच्या बाबतीत सावध रहा. दांपत्य सुखात थोडी कमी येऊ शकते. गैरसमज होऊ शकतात. जीवनसाथीच्या आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.

मकर : साढेसातीचा परिणाम राहील. नोकरी आणि बिजनेस करणाऱ्या लोकांच्या समस्या वाढ होऊ शकतात. नोकरी आणि बिजनेस मध्ये बदल होऊ शकतो. कायदेशीर गुंतागुंत वाढू शकते. महत्वाच्या कामात अडथळे आणि उशीर होऊ शकतो. खर्च वाढ होऊ शकते. विदेश प्रवासाचे योग होत आहेत. यादिवसात संयम बाळगा. इच्छा नसताना देखील कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. बेकायदा कामा पासून दूर रहा अन्यथा कोर्ट-कचेरीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. बचत संपू शकते. उधारी देऊ नका पैसे बुडण्याची शक्यता आहे. जुने आजार डोके वर काढू शकतात.

कुंभ : तुमच्यासाठी मेहनत करण्याची वेळ आहे. कामात बदल होऊ शकतो. काही निर्णय मानसिक तणाव देऊ शकतात. इनकम वाढ होऊ शकते. एक्स्ट्रा इनकमचे योग आहेत. मेहनत आणि कार्यकुशलता यामुळे फायदा होईल. लहान भाऊ-बहिणीचे आरोग्य बिघडू शकते. आरोग्याच्या बाबतीत तुमची जुनी समस्या दूर होऊ शकते पण सर्दी, खोकला आणि सांधेदुखी होऊ शकते. प्रेम समबंधात सावध राहा. संपत्तीच्या बाबतीतील जुने विवाद सोडवण्यासाठी प्रयत्न करा.

मीन : शनीच्या प्रभावाने कामकाजाची गती हळू राहील. नवीन काम सुरु करण्या अगोदर अनुभवी लोकाना विचार. जोखीम घेऊ नका. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. पोट आणि डोळ्याची समस्या होऊ शकते. वडिलांच्या सोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे.


Show More

Related Articles

Back to top button