कसोटी संघः राहुलला डच्चू; शुभमनला संधी

मुंबईः दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या केएल राहुल याला डच्चू देण्यात आला असून, रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे.

लोकेश राहुलला संघातून वगळ्याचा निर्णय अपेक्षित होता. राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. यासह मयंक अग्रवाल, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी यांना संघात स्थान देण्यात आले आहे. कसोटी संघात पुनरागमन केलेल्या रोहित शर्माला सलामीवीर म्हणून खेळवले जाऊ शकते.

२ ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार असून, याचा पहिला सामना विशाखापट्टनम येथे खेळला जाणार आहे. १० ऑक्टोबरपासून दुसरा सामना पुण्यात, तर १९ ऑक्टोबरपासून तिसरा सामना रांची येथे खेळवण्यात येणार आहे. ही कसोटी मालिका ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. या मालिकेनंतर टी-२० मालिकाही खेळवली जाणार आहे.

भारतीय कसोटी संघः – विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.