foodmoneyPeople

500 रुपये प्रति किलो विकले जातात जम्बो पेरू, काही महिन्यातच लोक बनत आहेत करोडपती

पेरूचे फळ असे फळ आहे जे दोन-तीन दिवसात खराब होते. हे फळ शिळे झाले तर याला खाणे तर सोडा घरामध्ये ठेवणे देखील मुश्कील होते. असे हे लवकर खराब होऊन नुकसान होण्याची जास्त शक्यता असलेले फळ ऑनलाईन 550 रुपये किलो भावाने विकून इंजिनियर ते शेतकरी झालेल्या नीरज ढांडा बद्दल माहीती मिळवण्यास तुम्हाला नक्की आवडेल. ज्यांनी हे अशक्य काम शक्य करून दाखवले आहे.

रोहतक मध्ये लहानाचे मोठे झालेल्या नीरजचे बालपण गावामध्येच गेले. संपत्ती म्हणून त्यांना त्यांच्या घरातून शेती मिळाली. पण तरीही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉम्प्यूटर सायन्स मध्ये इंजिनियरिंग केली आहे.

नीरज ने इंजिनियरिंग नंतर नोकरी करून काही पैसे वाचवले आणि आपल्या 7 एकर जमिनीवर शेती करण्याचे ठरवले. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यामुळे घरातील लोकांनी त्यांना नोकरी करण्याचा सल्ला दिला. पण त्यांच्या मनामध्ये काही वेगळेच चालले होते.

काही दिवसानंतर नीरज ने इलाहाबादच्या कायमगंजच्या नर्सरी मधून पेरूचे रोपटे खरेदी केले आणि आपल्या शेता मध्ये लावली. पेरूचे चांगले उत्पादन झाले पण जेव्हा ते बाजारात उत्पादन विकण्यास गेले तेव्हा मध्यस्थी (दलाल) एकत्र झाले आणि 7 रुपये किलो भाव देण्याचे ठरवू लागले. पण नीरजने आपली जिद्द सोडली नाही त्यांनी आपल्या गावातील बाजारात आणि शहरातील रस्त्यावर एकूण 6 काउंटर लावले आणि बाजार देत असलेल्या भावा पेक्षा दुप्पट भावाने पेरू विक्री केली. अनेक होलसेलर सुध्दा या काउंटरच्या मार्गाने नीरजच्या शेता पर्यंत पोचले. आता नीरजला अंदाज आला होता की जर लवकर खराब होणारे हे फळ लवकर विकल्या गेले नाही तर फायदा मिळवणे कठीण आहे.

पुढील वाटचालीसाठी त्यांनी छत्तिसगढ निवडले. तेथून त्यांनी एका नर्सरी मधून थाइलैंडच्या जम्बो ग्वावा चेह काही रोपटे खरेदी केले आणि आपल्या शेतात लावले. दीड किलो पर्यत वजन असलेल्या पेरूचे फळ त्यांना मिळाली. आपल्या शेतातील वेस्ट पासून बनवलेल्या ऑर्गेनिक खतामुळे त्यांना इलाहाबादच्या पेरू सारखा गोडवा त्यांच्या पेरू मध्ये मिळाला. यानंतर नीरज ने आपली कंपनी बनवली आणि हाईवे बेल्ट वर पेरू ऑनलाईन डिलिव्हरी सुरु केली. जम्बो पेरूचे वैशिष्ट्य हे आहे की हे पेरू 10 ते 15 दिवस फ्रेश राहतात. नीरज ने आपल्या वेबसाईट वर ऑर्डर देण्या पासून ते डिलिव्हरी मिळण्या पर्यंत ग्राहकांसाठी ट्रेकिंग सिस्टम बनवली. ज्यामुळे त्यांना समजेल की पेरू कोणत्या दिवशी बागेतून तोडला आणि त्यांच्या पर्यंत कधी पोचला. या इंजिनियर शेतकऱ्याने 36 तासात डिलिव्हरी देण्याचे टार्गेट ठेवले आहे.

प्रसिद्धी वाढल्यामुळे अनेक लोक येथे बाग पाहण्यासाठी येतात. तर काही शेतकरी ही टेक्नोलॉजी शिकू इच्छितात त्यांना फी आकारून ते ही टेक्नोलॉजी शिकवतील तसेच आता पर्यटन शेती च्या माध्यमातून नीरज आपली कमाई वाढवत आहे.


Show More

Related Articles

Back to top button