People

सावधान… तुमच्या मोबाईल मध्ये या गोष्टी सापडल्या तर 5 वर्ष सजा होईल, ओळख लपवून करता येते तक्रार

आपण आपल्या मोबाईल मध्ये कळत नकळत काही अश्या गोष्टींना जागा देतो किंवा कधी कधी या गोष्टी नकळत जागा घेतात ज्यामुळे तुम्ही संकटामध्ये सापडू शकता. आपल्या पैकी बहुतेक लोक हे मोबाईलवर इंटरनेट वापरतात, व्हाटसअप वापरतात आणि वेगवेगळ्या साईट्सला भेट देतात. पण तुम्हाला माहित आहे का यापैकी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 5 वर्षा पर्यंत जेल मध्ये टाकू शकते.

जर तुमच्या मोबाईल फोन, लैपटॉप किंवा कॉम्प्यूटर मध्ये चाइल्ड पोर्नोग्राफीशी निगडीत कंटेंट मिळाले तर तुम्हाला पाच वर्षा पर्यंत सजा होऊ शकते. तासेतर आईटी एक्ट ची धारा 67 बी मध्ये हे प्रावधान वर्ष 2000 पासून आहे पण गृह मंत्रालया द्वारे सुरु केलेले नवीन पोर्टल मुळे हे अजून जास्त प्रभावी होणार आहे.

cybercrime.gov.in या नावाने सुरु झालेले हे पोर्टल चाइल्ड पोर्नोग्राफी, रेप किंवा गैंगरेप असे कंटेंट सोशल मिडिया वर शेयर करणारे आणि पाहणारे यांच्यावर तक्रार दाखल करण्यासाठी आहे. याचा उद्देश अश्या प्रकारच्या व्हिडीओ आणि इमेजेस वर बंदी आणणे आहे. कारण असे मानले जाते कि या प्रकारच्या कंटेंटमुळे लहान मुलांवरील अत्याचार वाढत आहेत.

या पोर्टलवर ओळख लपवून किंवा दाखवून दोन्ही पद्धतीने तक्रार दाखल करता येईल. ओळख लपवून तक्रार दाखल केल्यास पुढील स्टेट्स समजणार नाही. चाईल्ड पोर्नोग्राफी, रेप किंवा गैंगरेप कैतेगरी निवडून नाव-पत्ता सांगावे लागेल, जे गुप्त राहील. ज्या व्यक्तीच्या, मोबाईल नंबर किंवा युनिट रिसोर्स लोकेटर (यूआरएल) विरुद्ध तक्रार करायची आहे ती माहिती भरावी लागेल. तुम्ही ज्या राज्यातील आहात तेथील नोडल एजन्सीकडे हि तक्रार पुढे पाठवली जाईल. तक्रारीची सत्यता पडताळल्या नंतर संबंधित एजन्सी आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करेल.

वर्ष 2000 मध्ये बनलेल्या आईटी एक्ट ची धारा 67 बी अनुसार चाइल्ड पोर्नोग्राफी, रेप किंवा गैंगरेप संबंधित कंटेंट सोशल मिडियावर अपलोड करणे, शेयर करणे, यास रेकोर्ड करणे किंवा वेबसाईट वर पाहणे अपराध मानले गेले आहे. पहिल्या वेळी या अपराधास 5 वर्ष सजा आहे. दुसऱ्यांदा पुन्हा असे केल्यास सात वर्ष सजा होऊ शकते.

पोलिसांनी 227 वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी गृह मंत्रालया कडे प्रस्ताव पाठवला आहे ज्या वेबसाईटवर अश्या प्रकारचे कंटेंट अपलोड आहे.


Show More

Related Articles

Back to top button