astrology

श्राद्धाच्या दिवसात करा हे 5 काम, तुमचे सर्व दुखः दूर होतील

श्राध्दाच्या वेळी आपल्या मृत नातेवाईकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राध्द कर्म केले जातात. श्राध्दाचा सामान्य असा नाही आहे की आपले पूर्वज आणि वडीलधारी आपल्या सोबत नाही आहे तर त्यांचे श्राध्द करून त्यांचा आशीर्वाद मिळवणे आहे. आपल्या मृत पूर्वजांना अनेक वर्षांनी देखील त्यांची पूजा करणे हे आपल्या धर्म शास्त्रात म्हंटले आहे. श्राध्दाच्या दिवसात जर पूर्वज प्रसन्न झाले तर त्यांच्या आशीर्वादाने मोठ्यातील मोठी समस्या दूर होते त्याच सोबत आपल्या नशिबाची साथ मिळते आणि नशीब उघडते. जर तुम्हाला देखील श्राध्दाच्या दिवसात आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला 5 काम सांगत आहोत जे केल्याने तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला देतील.

चला पाहू श्राद्धाच्या दिवसात पूर्वजांना प्रसन्न कसे करावे

भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी

जर तुम्ही श्राद्धाच्या दिवसात भगवान श्री कृष्णाची पूजा केली तर यामुळे तुमचे पूर्वजांचे इतर जन्म देखील सुधारतात अनेक वेळा असे होते कि पूर्वजांच्या चुकीमुळे त्यांचा पुढील जन्म अतिशय कष्टदायक असते अश्या स्थिती मध्ये जर तुम्ही भगवान श्री कृष्णाची पूजा केली तर त्यांचे जीवन सुधारेल आणि त्याचे मोठे फळ तुम्हाला प्राप्त होईल.

गीतेचा सातवा अध्याय पठन करावे

तुम्ही श्राध्दाच्या दिवसात घरामध्ये गीतेचा सातवा अध्याय पठन करावा, तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने हा पाठ आवश्य करावा कारण गीतेचा हा अध्याय पितरांना मुक्ती प्रदान करणारा आहे. एवढेच नाही तर भगवान शंकराने देखील गीतेच्या या अध्यायाचे महत्व सांगितले आहे. जर तुम्ही श्राद्ध दिवसाठ हा अध्याय पठन केला तर तुमचे पूर्वज प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल.

चुकूनही कोणाचे मन दुखवू नये

तुम्हाला या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे कि श्राद्ध दिवसा मध्ये चुकूनही कोणाचे मन दुखावले जाईल असे वागू नये कारण असे मानले जाते कि कोणत्याना कोणत्या रूपा मध्ये नारायण मिळतात आणि श्राद्ध दिवसात हे निश्चित पणे होते. तुमचे पूर्वज अनेक रूपाने तुमची परीक्षा घेतात.

गरजू लोकांची मदत करावी

जसे कि तुम्हाला माहित आहे कि माणसाचे कर्म आणि दुसऱ्याची मदत केल्यामुळे आपले कर्म बनतात तसेच आपण सगळे लोक वर्षभर तर लोकांची मदत सहसा करत नाही पण श्राद्ध दिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाने गरजू लोकांची मदत करतो ज्यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात. आपण गरजू आणि गरीब लोकांची नेहमी मदत केली पाहिजे कारण प्रत्येकाचा आत्मा हा परमेश्वराचा एक अंश आहे त्यामुळे गरीब आणि गरजू किंवा कोणाचीही मदत करणे म्हणजे ईश्वर सेवा करणे होय.

रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा.

आजकालची नवीन पिढी श्राद्धाच्या बद्दल काही जाणत नाही आज आपण श्राद्ध योग्य पद्धतीने करत नाही. खरतर श्राद्ध काही आनंदाचा सणवार नाही तर हे दिवस ईश्वराला स्मरण करण्याचे असतात त्यामुळे आपल्या घरातील मंदिरात (देवघरात) देवा समोर तुपाचा दिवा आवश्य लावावा.


Show More

Related Articles

Back to top button