स्वप्नात दिसणाऱ्या या 5 गोष्टी देतात मृत्यु संकेत

0
79

मृत्यु हे एक अटळ सत्य आहे ज्यास संपूर्ण ब्रह्मांड शक्ती टाळू शकत नाही. या जगामध्ये कोणताही व्यक्ती यास टाळू शकत नाही. पण हे देखील तेवढेच खरे आहे कि मृत्यू येण्याच्या अगोदर व्यक्तीला काही ना काही संकेत अवश्य मिळतात.

गरुड पुराण मध्ये या बद्दल सांगितले आहे कि हे संकेत कोणत्या प्रकारचे असतात. मंग ते स्वप्नाच्या माध्यमातून किंवा आजूबाजूच्या घटनांच्या माध्यमातून हे संकेत मिळतात. तर आज आपण येथे 5 अश्या स्वप्ना बद्दल जाणून घेऊ जे मृत्यूचे संकेत देतात.

स्वप्नात ढोल नगाडे वाजताना पाहणे चांगले नाही मानले जात. असे स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीस किंवा त्याच्या जवळील व्यक्तीस मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. तर स्वप्ना मध्ये एखाद्याचे मुंडन होताना दिसणे तर हे देखील चांगले मानले जात नाही. असे झाल्यास कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी ऐकण्यास मिळू शकते.

स्वप्नात महिलेला बिना कपडयांची दिसणे देखील अशुभ मानले जाते. स्वप्नात अश्या स्त्री सोबत संबंध करताना दिसणे हा देखील मृत्यूचा संकेत आहे.

स्वप्नामध्ये देवाचे दर्शन होणे चांगले मानले जाते यामुळे व्यक्तीच्या जीवना मध्ये आनंद येतो. पण जर आपल्याला स्वप्नात देवाची मोडलेली तुटलेली फुटलेली मूर्ती दिसली तर याचा संबंध वाईट बातमी मिळण्या सोबत असतो.

स्वप्नात अचानक एखादा वृक्ष पडणे अशुभ संकेत मानला  जातो. याच सोबत स्वतःला उंचावरून पडताना पाहणे हा देखील चांगला संकेत नाही मानला जात. असे होणे स्वतःच्या मृत्यूकडे इशारा करतो.

स्वप्नात एखाद्याला दम तोडताना पाहणे किंवा स्मशान स्वप्नात येणे मृत्यू जवळ असल्याचा इशारा असतो. असे मानले जाते कि असे स्वप्न सतत आले तर समजले पाहिजे कुटुंबात एखाद्याच्या मृत्यू बद्दल संकेत आहे.