चाणक्य निती : या 5 सवयीमुळे उध्वस्त होते पती-पत्नीचे जीवन, जाणून घ्या या आवश्य गोष्टी

आचार्य चाणक्य हे विद्वान होते. चाणक्य यांनी आपल्या जीवनातून मिळालेल्या अनुभवांना चाणक्य निती मध्ये लिहिले आहे. या ग्रंथा मध्ये त्यांनी पती-पत्नी बद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या अनुसार पती-पत्नी सुख-दुःखाचे सोबती आहेत.

पती-पत्नीचे कर्तव्य असते कि सुख-दुःखात ते एकमेकांची साथ देतील. जोड्या स्वर्गात बनतात हे तुम्ही ऐकलं असेल आणि हे एकदम खरं आहे कारण व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी नशिबात जे असत तेच त्याला मिळते. पती-पत्नी मध्ये विश्वास असणे आवश्यक आहे. विश्वास नसेल तर कोणतेही नाते टिकू शकत नाही.

पती-पत्नी ने एकमेकांचा आदर केला पाहिजे हे फार महत्वाचे आहे. जेव्हा दोन लोक एकमेकांचा आदर करतात आणि एक-दुसऱ्याच्या इच्छेचा आदर करतात तेव्हाच नाते व्यवस्थित चालते. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य निती मध्ये काही अश्या गोष्टी बद्दल सांगितले आहे ज्यामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येतो. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या गोष्टी.

पती-पत्नी हे दुःखाचे सोबती असतात. पत्नीच्या बाबतीत पती आणि पतीच्या बाबतीत पत्नी हस्तक्षेप करू शकते. हा दोघांचा अधिकार आहे. पण जर पती-पत्नी पैकी कोणालाही हा हस्तक्षेप पसंत नाही आणि त्यांना वाटले कि त्यांचे आपले वेगळे जीवन आहे तर अश्या स्थिती मध्ये वैवाहिक जीवन मोडण्याची शक्यता वाढते.

पती-पत्नी ने प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगितली पाहिजे. आपल्या गोष्टी शेयर केल्याने नाते मजबूत होते आणि एकमेकांवर विश्वास देखील टिकून राहतो. जेव्हा पती-पत्नी एकमेकांपासून गोष्टी लपवतात आणि एक दुसऱ्याला आपल्या पर्सनल प्रॉब्लेम पासून दूर ठेवतात तर समजावे नात्यात दुरावा आला आहे. अश्यात हे नातं कधीही मोडू शकत.

कोणत्याही नात्यात सम्मान असणे आवश्यक आहे. कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासाच्या आधारावर असतो. जर आपण एकमेकांचा सम्मान नाही करत तर नात्यात दुरावा येतो. जर लहानसहान गोष्टीत एक दुसऱ्याचा अपमान करण्यास सुरुवात झाली आणि शिवीगाळ झाली तर समजावे नात्याचा शेवट जवळ आला आहे.

अनेक वेळा पती-पत्नी रागाच्या भरात एक दुसऱ्याच्या कुटुंबीयांचा अपमान करतात. त्यांनी असे मुळीच नाही केलं पाहिजे. लग्ना नंतर त्यांनी एकमेकांच्या कुटुंबीयांची इज्जत केली पाहिजे जशी इज्जत ते स्वताच्या कुटुंबीयांचा करतात. लक्षात असुद्या स्वताच्या कुटुंबियांच्या विरोधात कोणतीही व्यक्ती काहीही ऐकणे पसंत करत नाही. त्यामुळे भांडणात कधीही एकमेकांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करणे टाळले पाहिजे. असे केल्याने परिस्थिती वाईट होणार नाही आणि नाते संपुष्टात येण्या पर्यंत गोष्टी जाणार नाहीत.

आजकाल पती-पत्नी दोघेही मिळून कमवतात तेव्हा घर चालते. पण जर पती-पत्नी आपल्या जोडीदारा पेक्षा जास्त धन-दौलतकडे लक्ष द्यायला लागला आणि त्याच्या इच्छा किंवा आनंदाचा सम्मान नाही करू लागला तर हे पवित्र नाते जास्त दिवस चालत नाही.