Connect with us

जेव्हा तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागतील हे पाच संकेत तेव्हा समजायचे की लिव्हर धोक्यामध्ये आहे

Health

जेव्हा तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागतील हे पाच संकेत तेव्हा समजायचे की लिव्हर धोक्यामध्ये आहे

जेव्हा आपल्याला कोणत्याही मोठ्या शारीरिक समस्याची माहिती मिळते तेव्हा आपण घाबरून जातो. आपल्याला समजत नाही की आता काय करावे आणि काय नाही. परंतु अचानक कोणताही गंभीर आजार आपल्याला होत नाहीत त्याचे संकेत आपल्याला पूर्वीपासून मिळायला लागतात आणि या संकेतामुळे आपण आपल्या शारीरिक समस्यांची ओळख करुन घेऊ शकतो. आणि त्यांना नियंत्रणात देखील आणू शकतो. पण अनेक वेळा हे संकेत ओळखण्यातच आपली चूक होते आणि ही समस्या गंभीर आजाराचे रूप घेऊन आपल्यासमोर येते. जसे लिव्हर कमजोर होण्याच्या स्थितीमध्ये देखील काही लक्षणे दिसतात त्यामुळे तुम्हाला समजू शकते की तुमचे लिव्हर डैमेज होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज आम्ही तुम्हाला लिव्हर डैमेज होण्याचे काही संकेत सांगत आहोत.

लिवर शरीरातील दुसरा सर्वात मोठा अवयव आहे तो शरीराच्या विविध क्रियांना नियंत्रित करतो. हे आपण खाल्लेले अन्न पचन करतो.शरीराच्या इम्युनिटी सिस्टिमला सपोर्ट करतो आणि अनेक रासायनिक पदार्थांचे उत्पादन करतो जे दुसऱ्या अवयवांसाठी मदतीचे असतात. याच सोबत रक्तशुद्धीकरण करतो. हे सर्व महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी आपले लीवर निरोगी असणे आवश्यक आहे यासाठी जर तुमचे लिवर योग्य पद्धतीने काम करत नसेल तर समजायचे की धोक्याची घंटा वाजली आहे. तसे तर लीवरचे खराब होण्याची लक्षणे दुर्लक्ष करणे कठीण आहे. परंतु बऱ्याच वेळा लोक त्यांना दुर्लक्षित करतात. आज आम्ही तुम्हाला अशीच काही लक्षणे सांगत आहोत. या लक्षणांच्या मदतीने तुम्ही लिवरच्या समस्यांना ओळखू शकता.

डोकेदुखी देखील एक संकेत आहे. होय, तुम्ही विचार करत असाल की लिवर डैमेज होण्याचा हा संकेत कसा असू शकतो, तर तुमच्या माहितीसाठी एक कमजोरी लिवर डोक्यामध्ये आणि रक्तामधे भरपूर कॉपर उत्पन्न करतो, ज्यामुळे तुम्हाला अल्जमाइजर सारखी समस्या होऊ शकते आणि तुम्ही नेहमी कन्फ्युज राहू शकता. यामुळे जर तुम्हाला असे वाटले की तुम्ही वेळोवेळी कन्फ्युज होता डिसिजन घेऊ शकत नाहीत तर एक वेळा डॉक्टरशी संपर्क करावा.

लिव्हर खराब होण्याच्या स्थितीमध्ये रक्तशुद्धीकरण व्यवस्थित होत नाही ज्यामुळे त्वचेवर डाग दिसायला लागतात. जर तुम्हालाही आपल्या त्वचेवरची असे डाग दिसायला लागले तर दुर्लक्षित करु नका डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जर पोटाच्या खालच्या बाजूला सूज किंवा वेदना होत असतील तर लिव्हर धोक्यामध्ये असू शकत. अश्या स्थितीत लगेच डॉक्टरला संपर्क करावा.

सांधेदुखी, सर्दी-खोकला, मळमळणे आणि भूक कमी लागणे हे संकेत लिवर खराब होण्याचे असू शकतात. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांसोबत त्वरित संपर्क करावा.

डोळे आणि त्वचा पिवळे दिसणे, लिवर धोक्यामध्ये असल्याचे हे सर्वात मोठे लक्षण आहे. त्यामुळे असे लक्षण दिसल्यास डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top