5 गोष्टी ज्यांना सुने ने स्वीकारले तर सासू सोबत मजबूत संबंध होऊ शकतात

0
103

भारतीय समाजामध्ये लग्न हे व्यक्तींचे नाही तर दोन कुटुंबाचे एकत्र येणे असते. अश्यात सुनेच्या समोर आपल्या पतीच्या घरातल्या लोकांसोबत जुळवून घेणे आवश्यक असते. या प्रयत्ना मध्ये सगळ्यात कठीण मानले जाते ते सासू सोबत ताळमेळ बसवणे. परंतु समजदारी आणि प्रेमाने हे हाताळले तर काही कठीण गोष्ट नाही. यासाठी आपण 5 गोष्टी सुनेने स्वीकारल्या तर सासू सोबत आपले संबंध घट्ट आणि मधुर होऊ शकतील.

असा बनवा सासू सोबत मजबूत नाते

 1. आपला दृष्टिकोन बदलावा

  काय तुमची सासू प्रत्येक कामात आपल्या चुका काढत आहे. आणि दिवसेंदिवस त्यांची ही सवय कमी होण्या ऐवजी वाढत आहे तर आवश्यकता आहे कि आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येक बाबतीत स्पष्टीकरण देण्या ऐवजी किंवा तक्रार करण्या पेक्षा चांगले राहील की आपण गप्प राहावे. विनाकारण वाद यामुळे होणार नाही. आपण रिप्लाय न दिल्यामुळे सासूचा आपल्या बद्दलची वागणूक देखील बदलेल. या बद्दल संयमाने वागणे चांगले राहील.

 2. प्रशंसा करू द्या

  जर तुमची सासू स्वताची प्रशंसा करण्याची एकही संधी सोडत नसेल आणि तुमचे पती आईच्या हाताच्या सामान्य पदार्थाची देखील प्रशंसा करत असेल तर तुम्ही नाराज होऊ नका. काहीही झाले तरी ती तुमच्या पतीची आई आहे आणि आईच्या हाताचे बनलेले अन्नाची गोष्टच निराळी असते हे तुम्ही देखील मान्य कराल. तुम्हाला देखील तुमच्या आईच्या हातचे पदार्थ आवडत असतीलच हे स्वाभाविक आहे.

 3. कमी बोलावे

  तुम्हाला असे वाटत असेल कि जास्त बोलण्यामुळे सासू सोबत वाद होण्याची शक्यता वाढते तर समजूतदारपणा यातच आहे कि आपण गप्प राहावे. तुम्ही गप्प राहिल्याने सासू अस्वस्थ होईल पण तिला वाद घालण्याची संधी मिळणार नाही. तसेही जास्त बोलण्यामुळे काहींना काही चुकीचे तोंडातून निघण्याची शक्यता वाढते. मीतभाषी राहील्याने वाद होण्याची शक्यता कमी होते.

 4. मुले आणि आजी मध्ये पडू नये

  आपल्या मुलांच्या आणि आजीच्या मध्ये पडू नये. कारण आजी आणि नातू-नाती मध्ये एक खास नाते असते. सासू तुमच्या पेक्षा जास्त तुमच्या मुलांवर प्रेम करेल. हे समजून आपण आनंदी राहिले पाहिजे. तुमची मुले आपल्या आजी-आजोबांकडून बऱ्याच गोष्टी शिकतात. ते मुलांना चांगल्या वाईटाची समज देखील देतात.

 5. कामाच्या बाबतीत वाद घालू नये

  तुम्ही घराची सून आहात आपण आपली जबाबदारी आणि क्षमता ओळखून आपल्याला झेपेल तेवढेच काम हातात घ्यावे. जास्त काम हातात घेऊन ते पूर्ण झाले नाही तर त्यामुळे वाद होऊ शकतात आणि आपल्या क्षमते पेक्षा जास्त काम केल्याने तुम्हाला थकवा येऊ शकतो तसेच चिडचिडेपणा वाढू शकतो. त्यामुळे हिम्मत करून तुम्हाला कामाचा ताण जास्त झाला असेल तर तसे आपल्या सासूला तुम्ही सांगू शकता. सासूच्या अनुभवाचा फायदा तुम्हाला नक्की होईल त्यांना तुम्ही कामाच्या बाबतीत सल्ला मागू शकता आणि तरीही काम जास्त असेल तर सासूला मदतीसाठी बोलू शकता.