Breaking News

रात्री झोपायच्या अगोदर स्त्री ने करावे हे काम सर्व समस्या होतील दूर आणि धन कमी पडणार नाही…

स्त्री घरची लक्ष्मी मानली जाते. असे मानले जाते कि ज्या घरा मध्ये स्त्रीचा सम्मान होत नाही तेथे माता लक्ष्मी निवास करत नाहीत. घरच्या स्त्री ने केलेल्या लहानसहान कार्याचा प्रभाव पूर्ण कुटुंबावर पडतो. चला जाणून घेऊ असेच काही उपाय ज्यास केल्यामुळे कुटुंबाचे यश, धन आणि सुखसमृद्धी कायम राहील.

वास्तुशास्त्र अनुसार संध्याकाळी अंधार पडल्या नंतर कोणीही दूध किंवा दही मागितलं तर ते दान मुळीच देऊ नये. असे केल्यामुळे स्त्री च्या कुंडली मधील चन्द्र ग्रह प्रभावित होतो आणि पैश्यांची तंगी होऊ शकते.

रात्री भोजन झाल्या नंतर कधीही स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नयेत. स्वयंपाकघर पूर्ण साफसफाई केल्या नंतरच झोपण्यास जावे. यामुळे घराची समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरा पासून दूर राहतात.

घरातील स्त्री ने संध्याकाळी तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावला पाहिजे. असे केल्याने घरात कधी तणावाचे वातावरण राहत नाही आणि कुटुंब रोगमुक्त राहते.

घरातील स्त्री ने कधीही रात्री झोपताना आपले केस मोकळे सोडू नयेत. असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते.

दररोज रात्री झोपण्याच्या पूर्वी घरातील झाडू घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला कोणाच्याही नजरेस सहजासहजी पडणार नाही असे ठेवले पाहिजे. असे केल्याने घरात समृद्धी कायम टिकून राहते.

रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात रिकामी बादली कधी ठेवू नये. रिकामी बादली स्वयंपाकघरात ठेवल्याने घरात तणावाचे वातावरण निर्माण होते, त्यामुळे बादली ठेवायची असल्यास ती पाण्याने भरून ठेवावी.

टिप : वरील उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारे दिलेले आहेत. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश्य नाही.

About Marathi Gold Team