Breaking News

आपल्या शक्ती अनुसार दुसऱ्या ची मदत करत राहिले पाहिजे तेव्हाच सफल होते आपले जीवन

सगळ्या धर्मा मध्ये दान करणे विशेष आणि महत्वपूर्ण मानले गेले आहे. दान केल्यामुळेच समाजा मध्ये समानता येऊ शकते. जर आपल्याला एखाद्याची मदत करायची असेल तर त्यासाठी अनेक मार्ग असू शकतात. या बद्दल एक कथा प्रसिद्ध आहे.

या कथेच्या अनुसार एका फळ विक्रेत्याने एका ग्राहकाला फळाची किंमत जास्त सांगितली. तेवढ्यात तेथे एक गरीब महिला आली. तिने केळी आणि सफरचंद यांची किंमत विचारली.

दुकानदाराने फळाचे दर अत्यंत कमी सांगितले. एवढे कमी भाव ऐकताच पहिल्या ग्राहकाला क्रोध आला. तो काही बोलेल त्या अगोदरच दुकानदाराने त्याला काही न बोलण्याचा इशारा केला. त्यावेळी ग्राहक शांत राहीला.

महिले ने फळ घेतले, पैसे दिले आणि तेथून निघून गेली. या नंतर पहिला ग्राहक रागाने म्हणाला मी तुझं काय वाईट केलं आहे, तू माझ्या कडून एवढे जास्त पैसे का मागत आहेस? त्या महिले कडून तर तू अत्यंत कमी पैसे घेतले.

दुकानदार म्हणाला भाऊ मी तुम्हाला फसवत नाही आहे. ती महिला अत्यंत गरीब आहे, स्वाभिमानी आहे. ती कधीही कोणाही कडून मदत घेत नाही. मी अनेक वेळा तिची मदत करण्याचा प्रयत्न केला, पण ती प्रत्येक वेळी मदत घेण्यास नकार देते.

तेव्हा मी विचार केला कि महिलेची मदत करण्यासाठी तिला कमी भावात फळ दिले पाहिजेत. तेव्हा पासून मी फळांचे नाम मात्र पैसे घेतो, ज्यामुळे तिचा स्वाभिमान मोडणार नाही आणि माझी मदत देखील तिला मिळेल.

कथेची शिकवण

हे अगदी चुकीचे आहे कि जर आपल्या जवळ जास्त धन नसेल तर आपण एखाद्याची मदत करू शकत नाही. आपली जेवढी शक्ती आहे, त्या प्रमाणात आपण दान करू शकतो. दान करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी मार्ग मिळू शकतो.

About Marathi Gold Team