Connect with us

जवळजवळ 400 वर्ष बर्फा खाली होते भगवान शंकराचे हे प्रसिध्द धाम

Astrology

जवळजवळ 400 वर्ष बर्फा खाली होते भगवान शंकराचे हे प्रसिध्द धाम

आपल्या देशा मध्ये भगवान शंकराची मंदिरे जागोजागी पाहण्यास मिळतात. तसेच 12 ज्योतिर्लिंग प्रसिध्द आहेत. असे म्हणतात की शंकराच्या या 12 ज्योतिर्लिंगच्या दर्शनाने आणि स्मरण केल्यामुळे व्यक्तीची सर्व पाप दूर होतात.

भोलेनाथांच्या या 12 ज्योतिर्लिगा पैकी एक धाम असे आहे जे जवळजवळ 400 वर्षा पर्यत बर्फाखाली होते. कोणते होते हे प्रसिद्ध धाम आज आपण त्याची माहीती घेऊया.

जियोलॉजिकल विभागाच्या वैज्ञानिकांच्या नुसार 12 ज्योतिर्लिंग पैकी सर्वश्रेष्ठ केदारनाथ धाम जवळजवळ 400 वर्ष बर्फाखाली होते. बर्फाखाली असल्यामुळे या मंदिराला कोणतेही नुकसान झाले नाही. पण जेव्हा मंदिरा वरील बर्फ निघून गेले त्याचे चिन्ह अजूनही मंदिरावर दिसतात.

असे म्हंटले जाते की 13 ते 17 व्या शताब्दी दरम्यान म्हणजेच जवळजवळ 400 वर्ष एक छोटा हिमयुग आले होते. ज्यामध्ये हिमालयाचा एक मोठा भूभाग बर्फा खाली झाकल्या गेले होते.

वैज्ञानिकानुसार आजही मंदिराच्या भिंतीवर आणि दगडांवर त्याची चिन्हे दिसून येतात. मंदिराच्या भिंती वरील आणि दगडा वरील हे चिन्ह ग्लैशियरच्या घर्षणामुळे आले आहेत.

केदारधाम तिन्ही बाजूने डोंगराने घेरलेले आहे. केदारनाथ धाम फक्त डोंगरानेच घेरलेला नाही तर येथे पाच पवित्र नद्यांचा अद्भुत संगम पण पाहण्यास मिळतो. याच जहागी मंदाकिनी, क्षीरगंगा, मधुगंगा, सरस्वती आणि स्वर्नगौरी या नद्यांचा संगम होतो.

तसे पाहता या नद्यांपैकी काही नद्यांचे आता अस्तित्व नाही राहीले पण अलकनंदाची सहायक नदी मंदाकिनी आज ही येथे आहे. येथे हिवाळ्यात भरपूर बर्फ आणि पावसाळ्यात भरपूर पाणी असते.

भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर उत्तराखंड मधील सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराला मोठ्या शिलाखंडाना जोडून बनवले गेले आहे.

16 जून 2013 मध्ये केदारनाथ येथे भीषण नैसर्गिक आपत्ती आली होती. या नैसर्गिक आपत्ती मध्ये असंख्य लोक मृत्यूमुखी गेले. या आपत्ती मध्ये केदारनाथ परिसरातील सर्व काही नष्ट झाले पण जर काही वाचले तर ते फक्त मुख्य केदारनाथ मंदिर.

ही आहे केदारनाथ धामच्या छोट्या हिमयुगा दरम्यान जवळजवळ 400 वर्ष बर्फाखाली राहण्याची आणि साल 2013 मध्ये नैसर्गिक आपत्ती झेलल्या नंतरही सुरक्षित राहण्याची माहीती.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top