foodhealth

घश्यात खवखव होत आहे तर हे सोप्पे उपाय करा.

वातावरण बदलत आहे थंडीची चाहूल सुरु झाली आहे आणि सोबतच सुरु झाली आहे सर्दी, खोकला आणि घस्यातील खवखव तर आज आपण पाहूयात यावर काही सोप्पे उपाय.

घसा खवखवत असेल तर त्यावर तात्काळ उपाय करावा अन्यथा खोकला ही होण्याची दाट शक्यता असते. घशाची खवखव दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला ४ घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांच्या माध्यमातून तुम्हाला एका दिवसात नक्कीच आराम मिळेल.

गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या कराव्यात
घसा खवखवत असेल तर त्यावर घरगुती उपाय करता येतो. एक ग्लास गरम पाणी आणि त्यात मीठ घालून गुळण्या कराव्या. असे केल्यास घशाला आराम मिळतो तसेच घशाला आलेली सूज कमी होते.

वाफ घेणे
अनेकदा घसा सुका पडल्याने गळ्यात इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. त्यामुळे एखाद्या मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेलने आपला चेहरा झाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी. असे केल्याने घशाला झालेलं इन्फेक्शन कमी होतं. ही क्रिया दिवसातून दोनवेळा करावी.

अद्रक
घशाची खवखव दूर करण्यासाठी अद्रक एक चांगला उपाय आहे. अद्रकमध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे इन्फेक्शन आणि घसा दुखी कमी होते. त्यासाठी एका कपात पाणी घ्यावे आणि त्यात अद्रक टाकून उकळावे. त्यानंतर त्यात मध मिसळा मग हे पेय दोन दिवसांत तीन वेळा घ्या.

मसाला चहा
लवंग, तुळस, अद्रक आणि काळी मिर्ची यांचं मिश्रण पाण्यात टाकून उकळावे. त्यानंतर चहा पावडर टाकून चहा बनवा. हा चहा गरम-गरम प्यावा.


Show More

Related Articles

Back to top button