देवघरा मध्ये या 3 वस्तू असणे आहे आवश्यक, कधी नाही होणार धन आणि बरकत कमी

परमेश्वराने आपल्याला घडवले आहे आणि सृष्टीची रचना केली आहे. त्यांच्यामुळेच आपण या जगामध्ये श्वास घेऊ शकत आहे आणि आपले जीवन जगू शकत आहे. या गोष्टीचे आभार आपण त्यांची पूजा करून किंवा प्रार्थना करून मानतो. विशेषतः हिंदू धर्मा मध्ये पूजापाठ जास्त महत्वाची आहे. पूजापाठ करून आपण आपल्या मनोकामना देवाला सांगतो आणि त्यांना पूर्ण करण्याची प्रार्थना करतो आणि त्यापूर्ण झाल्या नंतर देवाचे आभार देखील मानतो.

पण पूजा अर्चना करण्याच्या प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती आणि प्रथा आहेत. पण या बद्दल काही लोकांना माहिती नसते. जर पूजा  योग्य पद्धतीने नाही केली गेली तर पूजा केल्याचे फळ प्राप्त होत नाहीत. त्यामुळे नंतर लोक चिंतीत राहतात कि चूक झाली कुठे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे कि देवघरामध्ये कोणत्या वस्तूंचे असणे आवश्यक आहे आणि काय नसले पाहिजे.

शास्त्रा मध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे कि जर आपण हिंदू धर्मा मध्ये जन्म घेतला आहे तर घरामध्ये देवघर किंवा देवाची पूजा करण्यासाठी स्थान असणे अवश्य असले पाहिजे. तसेच हे देवघर किंवा देव्हारा ईशान्य कोपऱ्यात असला पाहिजे.

घरा मध्ये पूजा करणाऱ्या लोकांना हे माहीत असणे आवश्यक आहे कि घरा मध्ये भरपूर मुर्त्या असल्याने काही होणार नाही फक्त 2 किंवा 3 मूर्ती ठेवून पूजा करणे योग्य मानले जाते. जसे आपण घरा मध्ये राहता तर साफसफाई करता तसेच या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि आपण देवघर किंवा देव्हारा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची अस्वच्छता तेथे नसावी. नेहमी देवघर स्वच्छ ठेवावे. आता आपण जाणून घेऊ आपल्या देवघरा मध्ये कोणत्या तीन वस्तू असणे आवश्यक आहे.

आचमन

आचमन पूजा दरम्यान वापरली जाणारी सगळ्यात महत्वाची वस्तू आहे. एका छोट्याश्या तांब्याच्या भांड्यात पाणी आणि तुळशीची पाने ठेवलेली असतात आणि एक तांब्याचा चमचा असतो जो त्या भांड्यातील पाणी वापरण्यासाठी वापरला जातो.

कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला आचमन करूनच संकल्प घेतला जातो आणि प्रसाद म्हणून अनेक वेळा यास ग्रहण केले जाते. आचमन केल्याने पूजा सार्थक मानली जाते. तसेच दिवा प्रज्वलित केल्या नंतर आपला हात आचमन मधील पाण्यानेच स्वच्छ करतात कारण पूजेच्या दरम्यान आसनावरून उठणे चुकीचे मानले जाते.

पंचामृत 

हवन किंवा कथेच्या दरम्यान सगळ्यात जास्त उपयोगी प्रसाद कोणता असतो तर तो पंचामृत होय. आपल्याला वाटल्यास आपण रोजच्या पूजे मध्ये पंचामृत वापरू शकता.

पंचामृत बनवण्यासाठी दूध दही मध तूप आणि गूळ किंवा साखर वापरले जाते. यांना एकत्र करून पंचामृत बनवले जाते. पंचामृत मध्ये तुळशीचे पण टाकल्याने परमेश्वराचा प्रसाद बनतो. यास प्रथम परमेश्वरास अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून घेतला पाहिजे.

चंदन

चंदन हा थंड प्रवृत्तीचे असते त्यामुळे हे मस्तिष्क शांत ठेवते. चंदन आपल्याला मनाला शीतलता देते. पूजेच्या दरम्यान चंदन वापरणे चांगले मानले जाते. जर पूजा करताना आपण रागामध्ये आहात किंवा अशांत आहात तर पूजेचे फळ मिळत नाही. यामुळे चंदन लावून पूजा केल्याने क्रोध शांत होतो आणि मन शीतल राहत.त्यामुळे या तीन वस्तू आपल्या देवघरा मध्ये असणे आवश्यक आहे.