आज पासून सुरु होत आहे नवरात्री, या 9 राशींना मिळणार दोष आणि कुप्रभावा पासून मुक्ती

आम्ही आपल्याला रविवार 29 सप्टेंबर चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा rashi bhavishya 29 September 2019.

मेष राशी: Rashi Bhavishya

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते – परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. प्रवासाच्या संधी शोधाल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

वृषभ राशी: Rashi Bhavishya

आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. अतिशय क्षुल्लक कारणांवरून शय्यासोबत करणा-या प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल.

मिथुन राशी: Rashi Bhavishya

आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रणयराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या कुटुंबीयांसमवेत तुमचे वाद होतील, पण िदवसाच्या शेवटी तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल.

कर्क राशी: Rashi Bhavishya

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे.

सिंह राशी: Rashi Bhavishya

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. मित्रमैत्रिणींबरोबर सायंकाळ घालवणे अथवा शॉपिंग करणे तुमच्यासाठी खूपच सुखदायी आणि उत्तेजित करणारे ठरू शकते. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दु:खद आठवणी विसरून जाल आणि वर्तमानकाळ साजरा कराल.

कन्या राशी: Rashi Bhavishya

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय मते लादू नका, कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत, आणि ते विनाकारण नाराज होतील. काहीजणांना अनोखा नवा रोमान्स हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरुन जाईल. हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

तुला राशी: Rashi Bhavishya

तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

वृश्चिक राशी: Rashi Bhavishya

तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखूसेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमचा/तुमची आज खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तुम्हाला आज सरप्राइझ मिळेल.

धनु राशी: Rashi Bhavishya

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.

मकर राशी: Rashi Bhavishya

तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

कुंभ राशी: Rashi Bhavishya

इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा, त्याने तुम्हाला अमर्याद आनंद मिळेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल.

मीन राशी: Rashi Bhavishya

सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 29 September 2019 वाचले. आपल्याला rashi bhavishya 28 September 2019 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 29 September 2019 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.