आज या 6 राशीचे नशीब राहणार मजबूत, कुटुंबात येणार आनंद, नवीन संधी प्राप्त होणार

आम्ही आपल्याला सोमवार 21 ऑक्टोबर चे राशीभविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा rashi bhavishya 21 October 2019.

मेष राशी: Rashi Bhavishya

अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद न झाल्यामुळे उदासवाणा दिवस. जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.

वृषभ राशी: Rashi Bhavishya

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

मिथुन राशी: Rashi Bhavishya

तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

कर्क राशी: Rashi Bhavishya

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

सिंह राशी: Rashi Bhavishya

कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल.

कन्या राशी: Rashi Bhavishya

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला, त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.

तुला राशी: Rashi Bhavishya

धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅण्टीक दिवसाचे वाटोळे करू शकतो. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

वृश्चिक राशी: Rashi Bhavishya

स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

धनु राशी: Rashi Bhavishya

आपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल.

मकर राशी: Rashi Bhavishya

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा, त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे चार क्षण व्यतीत करा. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुम्ही जगात एकमेव अाहात, याची जाणीव आज तुम्हाला तुमचा/तुमची जोडीदार करून देईल.

कुंभ राशी: Rashi Bhavishya

आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

मीन राशी: Rashi Bhavishya

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 21 October 2019 वाचले. आपल्याला rashi bhavishya 21 October 2019 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 21 October 2019 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.