आज या 5 राशींवर कृपा करणार बजरंगबली, बदलणार नशीब, होणार प्रत्येक गोष्ट मनासारखी

आम्ही आपल्याला शनिवार 2 नोव्हेंबर चे राशीभविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा rashi bhavishya 2 November 2019.

मेष राशी: Rashi Bhavishya

प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे आनंदाचे निधान ठरेल. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे.

वृषभ राशी: Rashi Bhavishya

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

मिथुन राशी: Rashi Bhavishya

मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

कर्क राशी: Rashi Bhavishya

इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे, तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमचा/जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल.

सिंह राशी: Rashi Bhavishya

तणावामुळे किंचित आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यातून विश्रांतीसाठी मित्रमंडळी, कुटूंबातील सदस्य यांच्यासोबत वेळ घालवा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

कन्या राशी: Rashi Bhavishya

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल.

तुल राशी: Rashi Bhavishya

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणा-या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

वृश्चिक राशी: Rashi Bhavishya

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. तुमचे चुंबकसदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल.

धनु राशी: Rashi Bhavishya

आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.

मकर राशी: Rashi Bhavishya

आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

कुंभ राशी: Rashi Bhavishya

आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

मीन राशी: Rashi Bhavishya

सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 2 November 2019 वाचले. आपल्याला rashi bhavishya 2 November 2019 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 2 November 2019 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.