5 गोल्ड मेडल जिंकल्या नंतर, 19 वर्षाच्या हेमा दास ने जिंकला 6 वा गोल्ड मेडल अवघ्या 21 दिवसात, एक सलाम तिच्यासाठी

हेमा दास ला आपण भारताची रन-मशीन म्हणू शकता. भारतासाठी तीने गोल्ड मेडल जिंकण्याचा धडाका लावला आहे. हेमा दास ने केलेल्या या अद्भुत कामगिरी बद्दल आपण एक भारतीय म्हणून कौतुक असलेच पाहिजे. हेमा दास ने आपल्या अगदी कमी वयामध्ये मोठे यश मिळवले आहे त्यामुळेच ती अगदी खास आहे. हेमा दास हि फक्त 19 वर्षांची आहे.

एका एथलीटसाठी देशाला स्वर्ण पदक जिंकून देणे सोप्पे नसते. जीवनात येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना पार करून शारीरिक रूपाने फिट राहावे लागते आणि आपल्या ट्रेनिंगच्या दरम्यान कठोर मेहनत घ्यावी लागते पण हेमा दास ने हे सगळे यशस्वीरीत्या पूर्ण केले. तिच्या कठोर परिश्रमाने तिला देशासाठी स्वर्ण पदक जिंकून देण्या लायक बनवले.

गेल्यावर्षी U-20 वल्ड चैम्पियनशिप जिंकणारी हेमा दास पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे कारण तिने गुरुवारी या महिन्यातले सहावे स्वर्ण पदक जिंकले. दैनिक जागरण ने दिलेल्या बातमी अनुसार हेमा दास ने चेक गणराज्यात आपले सहावे स्वर्ण पदक जिंकले आहे.

हेमा ने आपले पाचवे स्वर्ण पदक 400 मीटर इवेंट पूर्ण करण्यासाठी 52.09 सेकंद घेतले होते जे सीजन-बेस्ट रेकॉर्ड होते. पण आता सहाव्या पदकाची कमाई करतांना हेमा दास ने 400 मीटरचे अंतर 51.46 सेकंदामध्ये पूर्ण केले. म्हणजे हेमा ने आपल्या पूर्वीच्या रेकॉर्ड अजून जास्त सुधारला आहे.

फक्त 21 दिवसांमध्ये हेमा दास ने एक नाही तर 6 स्वर्ण पदकाची कमाई केली आहे. हेमा चा रेकॉर्ड पहाता तिच्यासाठी हे सहज शक्य झाले आहे. तिने जिंकलेल्या सुवर्ण पदकामुळे तिला टाळ्या तर भरपूर भेटत आहेत पण भारताच्या या गोल्डन गर्लसाठी अजून बरेच काही मिळवणे बाकी आहे.

हेमा ला अजून वल्ड चैम्पियनशिपसाठी मेहनत घ्यावी लागेल आणि टोकियो ऑलम्पिक 2020 साठी आपले तिकीट बुक करण्यासाठी जगातील श्रेष्ठ एथिलीत लोकांना स्पर्धा करावी लागेल.

जेव्हा युवराज सिंह ने आयसीसी च्या T-20 वल्ड कप मध्ये 2007 साली स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर 6 छक्के मारले होते तेव्हा युवराज सिंहला 1 करोड रुपयांचे बक्षीस दिले गेले होते.

त्याच प्रमाणे हेमा दास ने सहा सुवर्ण पदक जिंकले आहेत आणि तिच्या या उपलब्धीसाठी ती मोठ्या बक्षिसासाठी पात्र देखील आहे. पण प्रश्न हा आहे कि भारता मध्ये क्रिकेट मधील उपलब्धी नंतर जेवढे कौतुक आणि बक्षिसे दिली जात तशीच ती हेमा दासला कोण देईल का?

हेमा दासला देखील युवराज सिंह प्रमाणे बक्षीस मिळवण्याचा हक्क आहे. या विधाना सोबत आपण सहमत असाल तर कृपया या पोस्टला आपल्या मित्र आणि इतर लोकांसोबत शेयर करा. ज्यामुळे सरकारच्या डोळ्यात अंजन पडेल आणि सरकार हेमा दासला देखील घवघवीत बक्षीस देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here