सूर्या ने केले राशी परिवर्तन, 3 राशींच्या जीवनात होणार मोठा बदलाव, जाणून घ्या कसा राहील आजचा दिवस

आम्ही आपल्याला शनिवार 19 ऑक्टोबर चे राशीभविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा rashi bhavishya 19 October 2019.

मेष राशी: Rashi Bhavishya

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल, सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीव खूप सुंदर झाले आहे.

वृषभ राशी: Rashi Bhavishya

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

मिथुन राशी: Rashi Bhavishya

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने व आत्मविश्वासाने वाटचाल कराल. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी: Rashi Bhavishya

आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. प्रेमप्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

सिंह राशी: Rashi Bhavishya

तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

कन्या राशी: Rashi Bhavishya

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

तुला राशी: Rashi Bhavishya

अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.

वृश्चिक राशी: Rashi Bhavishya

तंदुरुस्ती आणि वजन घटविण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणा-या लोकांना तुम्ही वचन द्यााल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल.

धनु राशी: Rashi Bhavishya

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

मकर राशी: Rashi Bhavishya

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता.

कुंभ राशी: Rashi Bhavishya

धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. आज तुम्ही प्रेम प्रदूषण पसरवाल. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

मीन राशी: Rashi Bhavishya

तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर, आपल्या मुलांबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे प्रेमाने जवळ येणे, तुम्हाला मिठी मारणे किंवा केवळ एक निष्पाप हास्यदेखील तुम्हाला तुमच्या चिंतांपासून दूर नेईल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 19 October 2019 वाचले. आपल्याला rashi bhavishya 19 October 2019 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 19 October 2019 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.