Connect with us

रविवार 15 जुलै : अनेक वर्षानंतर बनत आहे दिव्ययोग, 5 राशींचे चमकेल भाग्य

Today's Horoscope

रविवार 15 जुलै : अनेक वर्षानंतर बनत आहे दिव्ययोग, 5 राशींचे चमकेल भाग्य

आज रविवार 15 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पु-या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. मित्रमंडळींबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

मिथुन राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

भावनिकदृष्ट्या तुम्ही बेभरवशाचे आणि तुम्हाला नेमके काय हवे त्याबाबत चंचल मनोवृत्तीचे आहात. आर्थिक बाबी हाताळताना अधिक काळजी घेणे सावधनता बाळगणे ही काळाची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते, स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी.

कर्क राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आपली मते दुस-यांवर लादू नका, वादविवाद संघर्ष टाळण्यासाठी दुस-यांना काय सांगायचे आहे तेदेखील ऐकून घ्या. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल.

सिंह राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्ना करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरु करण्याची आत्यंतिक गरज आहे. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल.

कन्या राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

काहीही झाले तरी आपल्या मनाची शांतता संयम ढळू देऊ नका, नाहीतर त्यामुळे आपल्या घरात कायमस्वरूपी फूट पडेल. शांत डोक्याने प्रयत्न केलात तर घरात सुख समाधान शांतता नांदू शकेल, दुभंगलेले घर कधीच प्रगती करू शकत नाही. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या चंचल स्वभावामुळे तुम्ही भावाचा मूड खराब कराल. प्रेमबंध चांगले ठेवण्यासाठी परस्पर आदर व विश्वास याची जोपासना तुम्ही करण्याची गरज आहे. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.

तुल राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

कामाचा ताण आणि घरातील उणीदुणी यामुळे त्रस्त व्हाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. लहान मुले तुम्हाला व्यस्त ठेवतील आणि तुम्हाला आनंदही देतील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

शारीरिक व मानसिक आजारपणामुळे विषण्णता येईल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल – राहिलेली देणी परत मिळवाल – किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.

धनु राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. दिवसाच्या उर्वरित काळात पैशांची स्थिती सुधारेल. तुमच्या उधळ्या स्वभावावर तुमचे कुटुंबीय टीका करतील. भविष्यासाठी तुम्ही पैशांची बचत केली पाहिजे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.

मकर राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

तुमच्या स्वत:साठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला हॉस्पिटल गाठावे लागू शकते. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुमचा आनंदीपणा नष्ट करेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमच्या वैवाहिक आयुष्यापासून थोडीशी मोकळीक मिळावी, असे तुम्हाला वाटू शकेल.

मीन राशी भविष्य (Sunday, July 15, 2018)

मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. मुलांसोबत तुम्हाला आज खूप कठोर वागावे लागेल. तुमच्या लहरी स्वभावाला आवर घाला, अन्यथा तुमची मैत्री तूटू शकते. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा. वैवाहिक आयुष्यात बऱ्याच मागण्या पूर्ण कराव्या लागतात, तुम्ही जर त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे सतर्क राहा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top