माता लक्ष्मीच्या कृपेने या 3 राशींना मिळणार नोकरी मध्ये फायदा, बिजनेस देखील चमकणार

0
20

आम्ही आपल्याला गुरुवार 10 ऑक्टोबर चे राशीभविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा rashi bhavishya 10 October 2019.

मेष राशी: Rashi Bhavishya

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! कामातील बदल तुम्हाला मन:शांती मिळवून देईल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.

वृषभ राशी: Rashi Bhavishya

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.

मिथुन राशी: Rashi Bhavishya

चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कर्क राशी: Rashi Bhavishya

तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

सिंह राशी: Rashi Bhavishya

आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत करणे जड जाईल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.

कन्या राशी: Rashi Bhavishya

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका.

तुला राशी: Rashi Bhavishya

आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल आणि त्यामुळे विवाहबंधन तोडण्यासाठी तुम्ही उद्युक्त होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी: Rashi Bhavishya

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

धनु राशी: Rashi Bhavishya

आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

मकर राशी: Rashi Bhavishya

तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल – आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

कुंभ राशी: Rashi Bhavishya

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

मीन राशी: Rashi Bhavishya

तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 10 October 2019 वाचले. आपल्याला rashi bhavishya 10 October 2019 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 10 October 2019 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.