health

तुम्ही पण डायबिटीजचे शिकार झालेले नाहीत ना, जाणून घ्या 10 मुख्य लक्षण

तुम्हाला माहीत आहेच कि पूर्ण जगामध्ये अनेक प्रकारचे आजार आहेत. पण एक आजार असा आहे जो संपूर्ण जगामध्ये वेगाने आपली पकड मजबूत करत आहे आणि दिवसेंदिवस लाखो लोकांना आपला शिकार बनवत आहे. होय, तो आजार आहे डायबिटीज, प्रत्येक व्यक्तीमध्ये डायबिटीज होण्याचे वेगवेगळे लक्षण दिसून येतात. या लक्षणांपैकी आपल्या शरीरावर काही लक्षण दिसले तर आपल्याला सावध होण्याची गरज आहे. चला पाहू कोणती लक्षणे एका डायबिटीजचा शिकार झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर दिसून येतात.

जर आपल्या शरीरावर या लक्षणा पैकी कोणतेही लक्षण दिसले तर आपण डायबिटीज चेक करून घेतले पाहिजे. जर आपल्याला शंका आली कि आपण मधुमेहाचे शिकार झालेलो आहोत तर त्वरित आपण डॉक्टर कडून त्याबद्दल चेकअप करून घेतला पाहिजे. ज्यामुळे आपल्याला समजू शकेल कि आपणास डायबिटीज आहे किंवा नाही.

डायबिटीज समस्याच झाल्यास मुख्यतः हे 10 लक्षण दिसून येतात

जर आपणास अचानक लघवीचा जास्त त्रास होत असेल तर आपण डायबिटीज चेकअप करणे आवश्यक आहे.

सामान्यते पेक्षा जास्त तहान लागत असेल तर आपण डायबिटीजचे शिकार झालेले असू शकतो.

अचानक भूक वाढणे हे देखील एक मुख्य लक्षण आहे.

जर आपले वजन कमी होण्यास सुरुवात झाली असेल तर आपण सावध झाले पाहिजे कारण हे डायबिटीज झाल्यावर होते. त्यामुळे आपला चेकअप करून घ्यावा.

व्यक्ती शारीरिक काम करून थकतो पण आपण सामान्य पणे थकत असू तर आपण आपल्या जवळील हॉस्पिटल मध्ये जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे.

कोणतेही काम करण्यासाठी त्यामध्ये रस असणे आवश्यक आहे पण अशी समस्याच झाल्यास आपल्याला कोणत्याही कामामध्ये रस राहत नाही आणि मन एकाग्र होत नाही.

जर आपले हात पाय जास्त सुन्न होऊ लागले आहेत किंवा जर ते आखडायला लागले आहेत तर ही समस्याच होऊ शकते.

डोळ्यांची नजर कमी होणे म्हणजे आपल्याला अंधुक किंवा अस्पष्ट दिसण्यास सुरुवात झाली असेल तर हे एक लक्षण असू शकते.

शरीरावर लागलेली जखम लवकर ठीक होत नसेल तर हे डायबिटीजचे मुख्य लक्षण असू शकते. जर आपल्या शरीरामध्ये हे लक्षण दिसले तर डॉक्टरांकडून डायबिटीज चेकअप करून घ्यावा.

डायबिटीज मध्ये होणारे हे मुख्य 10 लक्षण आज आपल्याला समजली आहेत जर या लक्षणांपैकी कोणतेही लक्षण आपल्याला किंवा आपल्या कुटुंबियांना झालेले दिसले तर डॉक्टरांकडून त्वरित डायबिटीज चेकअप करून घ्यावा.

तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा आहे जर लेख आवडला असेल तर आमचे फेसबुक पेज लाईक करण्यास विसरू नका, आम्ही असेच उपयोगी आणि मनोरंजक लेख आपल्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद.


Tags
Show More

Related Articles

Back to top button