Breaking News

आज चिंता मुक्ती अनुभव करतील या 5 राशीचे लोक, अप्रत्यक्ष लाभ मिळण्याचा बनत आहे योग

आम्ही आपल्याला सोमवार 10 फेब्रुवारी चे राशीभविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा .

मेष राशी:

शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल.

वृषभ राशी:

स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबातील सदस्य आपल्या अपेक्षा पु-या करू शकणार नाहीत. आपल्या लहरीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे त्यांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. त्यापेक्षा आपण सुरू केलेल्या कामावर नियंत्रण राहण्यासाठी आपली कार्यपद्धती बदला. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. तुमच्या अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या – आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

मिथुन राशी:

आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. तुम्ही साथसंगत गमावलीत तर तुमच्या हास्याला अर्थ नाही – तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही – तुमचे हृदय ठकठक करणार नाही. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे काम ही सुटून जातील. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.

कर्क राशी:

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत तर, ते आज ते तुमच्याशी तक्रार करू शकतात कारण, तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

सिंह राशी:

आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करुन टाकतात. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

कन्या राशी:

आयुष्याकडे दुखी गंभीर चेह-याने पाहू नका. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. तुम्हाला सोशल मीडीयावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतात, पण लग्नामुळे तुमच्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावूक व्हाल.

तुल राशी:

प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. वेळ भरभर निघून जाते म्हणून, आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, तुमचा/तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल.

वृश्चिक राशी:

मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर, तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधी ही वेळ काढू शकणार नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज रोमँटिक मूडमध्ये आहे.

धनु राशी:

दुसºयांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाºया तुमच्यावरील शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभ करू शकाल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. प्रेमात आज तुमचा सुदैवी दिवस आहे. तुम्ही इतके दिवस ज्या कल्पनाविश्वात जगत होतात, तुमचा/तुमची जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे. कुठल्या पार्क मध्ये फिरतांना आज तुमची भेट कुणी अश्या व्यक्ती सोबत होऊ शकते ज्याच्या सोबत तुमचे मतभेद होते. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमँटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल.

मकर राशी:

आपल्या मित्रांबरोबरील अथवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहचवतील. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील – आणि एक चकित करणारी छान भेटवस्तू मिळण्याचीही शक्यता आहे. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.

कुंभ राशी:

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. मुलांच्या बक्षिस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरु शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. संद्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात परंतु, या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

मीन राशी:

तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु, ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 10 February 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 10 February 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 10 February 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.