money

31 मार्च नंतर 19 करोड पैन कार्ड होतील रद्द, असे चेक करा तुमचे स्टेटस

आयकर विभाग 31 मार्च 2019 नांतर 19 करोड पैन कार्ड रद्द करणार आहे. असे यासाठी कारण या पैन कार्ड धारकांनी आपला आधारकार्ड अजूनही पैन कार्ड सोबत लिंक केलेला नाही आहे. सरकारने फार पूर्वीच आधार कार्ड आणि पैन कार्ड एकमेकांसोबत लिंक करणे बांधकारक केलेले आहे. याबद्दल सुप्रीम कोर्टाने देखील निर्देश दिलेले आहेत.

42 करोड लोकांकडे आहेत पैन कार्ड

आता पर्यंत आयकर विभागाने देशामध्ये 42 करोड लोकांना पैन कार्ड दिलेले आहे. केंद्रीय कर बोर्ड चे चेयरमैन सुशील चंद्रा यांनी सांगितले कि फक्त 23 करोड लोकांनीच पैन कार्ड आधार सोबत जोडले आहे. सुप्रीम कोर्टाने आधार बदल निकाल देतांना आयकर भरताना आधार अनिवार्य केलेला आहे. आधार आणि पैन जोडण्यासाठी 31 मार्च लास्ट डेट आहे.

असे चेक करा पैन कार्ड चे स्टेटस

तुम्ही तुमचे पैन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले आहे किंवा नाही हे अगदी सहज चेक करू शकता. यासाठी इनकम टैक्स डिपार्टमेंटच्या वेबसाईट वर जाऊन स्टेटस चेक करू शकता.

फॉलो करा ही प्रोसेस

सगळ्यात पहिले आयकर विभागाची वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल.

येथे Know Your PAN नावाचा ऑप्शन आहे.

येथे क्लिक केल्यावर एक विंडो ओपन होईल.

यामध्ये आपले आडनाव, नाव, स्टेट्स, जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.

तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक OTP येईल.

OTP येथे उघडलेल्या विंडो मध्ये टाकून सबमिट करा.

यानंतर तुमच्या समोर तुमचा पैन नंबर, नाव, सिटीजन, वार्ड नंबर आणि रिमार्क येईल.

रिमार्क मध्ये लिहलेले असेल आपले पैन कार्ड एक्टिव आहे किंवा नाही.

how to link aadhar and pan card

असे करा लिंक

आयकर विभागची  ई-फाइलिंग वेबसाइट (www.incometaxindiaefiling.gov.in) ओपन करा.

येथे डाव्या बाजूला दिलेल्या लाल रंगाच्या LInk Adhaar वर क्लिक करा.

जर तुमचे आयकर अकाउंट नसेल तर रजिस्टर करून घ्या.

लॉग-इन केल्यावर पेज ओपन होईल, ज्यामध्ये वर दिसत असलेल्या निळ्या पट्टी मध्ये प्रोफाइल सेटिंग निवडा.

प्रोफाइल सेटिंग मध्ये तुम्हाला आधार कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन मिळेल. यास निवडा.

येथे दिलेल्या सेक्शन मध्ये तुमचा आधार नंबर आणि दिलेले कैप्चा कोड भरा.

माहिती भरल्यानंतर खाली दिसत असलेल्या link Adhaar ऑप्शन वर क्लिक करा.

 

Tags
Show More

Related Articles

Back to top button