Uncategorized

चाणक्य: अश्या जागी 1 मिनिट देखील थांबल्यामुळे बर्बाद व्हाल, या 2 गोष्टींवर नियंत्रण ठेवले तर यशस्वी बनाल

आचार्य चाणक्य पाटलीपुत्र (ज्यास आता पटना या नावाने ओळखले जाते) चे महान विद्वान होते. चाणक्य यांना त्यांच्या न्यायप्रिय स्वभावामुळे ओळखले जायचे. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मंत्री असून देखील ते एका सामान्य झोपडी मध्ये राहत होते. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. चाणक्य नीती मध्ये अश्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे ज्यांच्यावर आपण लक्ष देऊन आपण आचरण केले तर यशस्वी होण्या पासून आपणास कोणीही अडवू शकत नाही. याशिवाय चाणक्य नीती मध्ये चाणक्य ने एका अश्या जागे बद्दल सांगितले आहे जेथे थांबल्यामुळे व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये बर्बाद होतो.

असे म्हणतात कि जेव्हा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचतो तेव्हा त्याचे पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजे. कारण बहुतेक वेळा पाहिले गेले आहे कि यशस्वी व्यक्ती विसरून जाते कि शिखरावर पोहचण्यासाठी त्याने कोणकोणत्या समस्यांचा सामना केला आहे. कोणीतरी हे अगदी खरे बोलले आहे कि व्यक्तीने त्याचा वाईट काळ कधी विसरला नाही पाहिजे. कारण त्याला हे लक्षात असले कि तो कोणत्या स्थितीतून पुढे गेला आहे तेव्हा तर त्याचे पाय जमिनीवर राहतील आणि दुसऱ्या सोबत तो काही वाईट करणार नाही. आपल्या उपलब्धी आणि यशासाठी नेहमी आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. त्यामुळे चाणक्य यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी लक्षात ठेवून आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

या दोन गोष्टींना नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे

दुसऱ्या सोबत तुलना करू नये

काही लोक स्वताची तुलना दुसऱ्या सोबत करतात आणि यामुळे विना कारण इर्ष्या मनामध्ये निर्माण होते. जी व्यक्ती स्वतः चांगले काम नाही करत आणि विनाकारण दुसऱ्याला पाहून जाळतो तो जीवना मध्ये कधीही यशस्वी होत नाही. लक्षात ठेवा कि आपली प्रतिस्पर्धा फक्त आपल्या सोबत असली पाहिजे. स्वतःच रेकॉर्ड बनवावे आणि स्वतःच त्यांना मोडण्याचा प्रयत्न करावा. व्यक्तीने आपला प्रतिस्पर्धा आपल्या सोबतच केली पाहिजे.

रागावर नियंत्रण मिळवणे

काही लोकांना लहान लहान गोष्टींवर राग येतो. जास्त राग येणे चांगली गोष्ट नाही कारण जेव्हा व्यक्तीला राग येतो तेव्हा त्याचे डोके (मस्तिष्क) चालणे बंद होते. आपण कितीही समजदार आणि बुद्धिवान असले तरी राग आल्यावर काहीही कळत नाही. क्रोध म्हणजेच राग केल्यामुळे आपले नाते आणि आपले मस्तिष्क यांना हानी होते. रागामध्ये व्यक्तीचे विचार नकारात्मक दिशेला जातात जे अनेक वेळा मानवतेच्या दृष्टिकोनातून अपराध होतो. अश्या लोकांना कधी शांती मिळत नाही आणि ते नेहमी आपल्याच धुंदीत असतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणाऱ्याला बुद्धिमान बोलले जाते.

या जागेवर एक मिनिट देखील थांबले नाही पाहिजे

चाणक्य नीती मध्ये सांगितले गेले आहे कि जर आपल्या आजूबाजूला दंगलीचे वातावरण होत आहे तर अशी जागा त्वरित सोडण्यातच भलाई आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे कि जर राजाने आपल्या पूर्ण सेने सह आपल्या राज्यावर आक्रमण केले तर बुद्धीमानी यातच आहे कि आपण आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आपण तेथून निघून जावे. याच सोबत चाणक्य सांगतात जे राज्यात दुष्काळ पडला असेल तर अशी जागा देखील त्वरित सोडली पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button