1 डिसेंबर पासून बदलले हे 5 नियम : आपल्या खिशावर करणार परिणाम, जाणून घ्या…

एक डिसेंबर पासून काही नियम बदलले आहेत. एकीकडे या नियमामुळे आपल्याला काही फायदे होणार आहेत तर दुसरीकडे या गोष्टीकडे लक्ष ठेवलं नाहीतर नुकसान देखील होऊ शकते. या बदलामध्ये गैस सिलेंडरचे दर, मोबाइल टैरीफ, रेल्वेचा मेन्यू इत्यादी समाविष्ट आहे. तर चला जाणून घेऊ 1 डिसेंबर पासून काय-काय बदल होणार आहेत.

मोबाईलचं बिल जास्त द्यावं लागेल : देशातील मोठ्या कंपन्या रिलायन्स, एयरटेल, वोडाफोन-आयडिया यांचे कॉल दर एक डिसेंबर पासून महाग होतील. हे दर किती वाढतील याचा खुलासा कंपनीने केलेला नाही. कंपन्यांचे म्हणणे आहे कि नुकसान आणि उद्योगाची व्यावहारिकता वाढवण्यासाठी हे दर वाढवणे आवश्यक झालं आहे.

महाग होणार वीमा पॉलिसी : बिमा विनियामक आणि विकास प्राधिकरण (इरडा) च्या नव्या दिशा-निर्देशामुळे आपल्या जीवन वीमा पॉलिसीचा प्रीमियम 15 टक्के पर्यंत महाग होऊ शकतो. या नवीन नियमांचा परिणाम 1 डिसेंबर 2019 च्या अगोदर विक्री झालेल्या पॉलिसीवर होणार नाही. पॉलिसी मध्ये बंद झाली तर पाच वर्षाच्या आत त्यास आता रिन्यू देखील करू शकता. सध्या हा काळ दोन वर्षांचा आहे.

रोख काढण्याचा नियम : आयडीबीआय बैंकचे एटीएम संबंधित नियम देखील एक डिसेंबर पासून बदल होणार. जर या बैंकेचा ग्राहक दुसऱ्या बैंकेच्या एटीएम मधून व्यवहार करतो आणि कमी बैलेंस असल्यामुळे व्यवहार फेल झाला तर त्या ग्राहकास 20 रुपये प्रति ट्रांजेक्शन द्यावे लागेल.

एनईएफटी 24 तास करू शकता : 1 डिसेंबर पासून बैंक ग्राहक 24 तास एनईएफटी करू शकाल. आता सगळ्या वर्किंग दिवसात सकाळी आठ वाजल्या पासून संध्याकाळी सात वाजे पर्यंत एनईएफटी करू शकता. जानेवारी पासून यावर कोणतेही शुल्क देखील दयावे नाही लागणार.

एथेनॉलच्या किमती मध्ये वाढ : सप्टेंबर मध्ये केंद्र द्वारे 1.64 रुपये पर्यंत वाढ केली गेलेली एथेनॉलच्या किमती 1 डिसेंबर पासून लागू होतील. वाढलेल्या दराचा फटका डिसेंबर पासून सहन करावा लागणार आहे.