astrology

साप्ताहिक राशीभविष्य दि. 15 एप्रिल 2018

आज रविवार दिनांक 15 एप्रिल 2018. पाहू हा आठवडा 12 राशींना राशीभविष्यच्या दृष्टीकोनातून कसा राहणार आहे.

मेष

 

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अडचणी आल्या तरी त्यानंतर मात्र तुमच्या कार्याला वेग येईल. वृषभ राशीत शुक्र प्रवेश होत आहे. व्यवसायात तुमचा अंदाज बरोबर येईल. कुणालाही आश्वासन देताना व्यवहाराचा विचार करा. राजकीय, सामाजिक कार्याचा मनाप्रमाणे विस्तार होईल. जोरदार प्रयत्न करा. लोकांच्या मनातील व्यथा समजून घ्या. प्रामाणिक प्रयत्न केल्यास तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. उत्साह वाढेल.

वृषभ

सप्ताहाच्या सुरुवातीला संघर्ष करण्याची वेळ येईल. कोणताही प्रश्न हातघाईवर येऊन सोडवता येणार नाही. तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश होत आहे. परिस्थितीचा नीट अभ्यास करून राजकीय, सामाजिक प्रश्न सोडवा. आरोप तुमच्यावर होतील. निर्णय चुकीचा ठरेल. नोकरीत काम करताना सावध रहा. कायद्याच्या विरोधात जाण्याचे धाडस केल्यास नुकसान होईल. पोलीस केस होऊ शकते.

मिथुन

वृषभेत शुक्र प्रवेश व सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. प्रगतीची कोणतीही संधी सोडू नका. मिळालेल्या अधिकाराचा वापर करून तुमचे व्यक्तिमत्त्व उजळ बनवा. राजकीय, सामाजिक, कार्यात योजना मार्गी लावता येतील. प्रति÷ा मिळेल. अक्षय्य तृतीयेच्यादिवशी मनावर दडपण येईल. वाद संभवतो. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. व्यवसायावर जम बसेल. कोर्टकेस संपवा.

कर्क

मागील चुका सुधारण्याची संधी मिळेल. तुमचे वर्चस्व वाढेल. शुक्र वृषभेत प्रवेश करीत आहे. चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक विभागात विरोधकांना निरुत्तर करू शकाल. कार्याचा वेग वाढवा. संघर्ष आहेच कायदा पाळा. नोकरी लागेल. जमिनीसंबंधी काम करता येईल. व्यवसायात मोठे काम मिळवता येईल. महत्त्वाची सर्व कामे करा. मान-सन्मान मिळेल.

सिंह

रविवारी धावपळ होईल. मनाविरुद्ध घटना घडू शकते. परंतु त्यानंतर तुमच्या प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. वृषभेत शुक्राचे राश्यांतर तुमचा उत्साह व महत्त्वाकांक्षा वाढवणार आहे. राजकीय, सामाजिक कार्यात लक्ष द्या. ध्येय गाठा. लोकप्रियता मिळेल. लोकांचे प्रश्न जिव्हाळय़ाने सोडवा. यश मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पूर्ण कराल. नवे मित्र मिळतील. धंदा वाढेल.

कन्या

मिळालेला मान-सन्मान सभ्यतेने स्वीकारा. उतू नका, मातू नका, समाजसेवेचा वसा टाकू नका. संघर्ष तात्पुरता आहे. किचकट प्रश्नांची उत्तरे देण्यात वेळ न घालवता राजकीय, सामाजिक कार्याची गती वाढवा. नम्रता ठेवा. तुम्हाला या सप्ताहात नवे शिकावयास मिळेल. अनुभवात नवी भर पडेल. खर्च वाढेल. संसारात वाद संभवतो. नोकरीत सावध रहा.

तुला

वृषभेत शुक्र प्रवेश व सूर्य हर्षल युती होत आहे. जीवनाला कलाटणी देणारी घटना घडेल. कामाची योग्य पद्धतीने मांडणी करा. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. नोकरीचा प्रश्न सुटेल. प्रयत्न सोडू नका. वेळेला महत्त्व द्या. प्रेमाच्या माणसांना समजून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव राहील. अविवाहितांना योग्य स्थळे येतील. संततीची समस्या सोडवा.

वृश्चिक

वृश्चिकेच्या सप्तमस्थानात शुक्र प्रवेश व सूर्य, हर्षल युती होत आहे. दुसऱयावर टिका करण्यापेक्षा स्वत:च्या कार्यावर भर द्या. मीपणा करू नका. प्रगतीची संधी सोडू नका. सर्वत्र यश मिळवणे सोपे नाही. परिश्रम घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात विरोधक अडचणी आणतील. वेगळय़ाच प्रकारची प्रसिद्धी मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात संधी येईल. प्रेमात फसू नका. अभ्यासात लक्ष द्या.

धनु

वृषभेत शुक्र प्रवेश व चंद्र, गुरु प्रतियुती होत आहे. नोकरीची समस्या सुटेल. मनाप्रमाणे घटना घडतील. वादाचे प्रसंग येतील. रागावर नियंत्रण ठेवणे अशक्मय होईल. राजकीय, सामाजिक कार्यात मान प्रति÷ा, मिळेल. शनि, मंगळाच्या एकत्रीकरणाने घराघरात प्रश्न व वाद होऊ शकतात. जमिनीवरून तणाव होऊ शकतो. महाराष्ट्राला वेगळय़ाच संकटातून जावे लागेल. परंतु महाराष्ट्राची प्रति÷ा राहिलच.

मकर

शुक्राचे राश्यांतर मित्र सहवास वाढवेल. प्रिय व्यक्तीच्या भेटीगाठी संभवतात. व्यवसायात वाढ होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती संभवते. कोर्टकेसमध्ये सावध रहा. शेतकरीवर्गाने जमिनीच्या व्यवहारात मालक रहावे. फसगत संभवते. नोकरीत कामाचा व्याप थोडा वाढण्याची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात हातात घेतलेल्या योजना लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येईल. प्रवासाचे बेत आखले जातील.

कुंभ

शुक्राचे राश्यांतर घरातील वातावरण थोडे तणावाचे निर्माण करणार आहे. आपल्या मतावर ठाम राहून अजून गैरसमज निर्माण होऊ शकतात. थोरामोठय़ांच्या सल्ल्याने व विषयावर चर्चा करून मग निर्णय नक्की करणे योग्य ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी असेल. तुमचे संभाषण जमेल. शेअर्समध्ये फायदा संभवतो. कला क्रीडा क्षेत्रात प्रकृतीची थोडी काळजी घ्या. दु:खापत संभवते. वाहन जपून चालवा.

मीन

वृषभ राशीत शुक्राचा प्रवेश होत आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मनातील गोष्ट घरातील व्यक्तींना सांगण्याची संधी मिळेल. आपल्या मनाप्रमाणे काही निर्णय लागण्याची शक्मयता आहे. नाटय़ चित्रपट क्षेत्रात नवीन कामे मिळतील. परदेशी जाण्याची संधी मिळेल. नवीन लोकांची ओळख होईल. नोकरीत चांगला बदल करण्याची संधी मिळेल. शेतीच्या कामात आताच पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करा. प्रवास होईल. पैसे जपून ठेवा.


Show More

Related Articles

Back to top button