astrology

राशीभविष्य दि. 18 एप्रिल 2018 : या राशींच्या बंद नशिबाची दारे आता उघडणार आहेत, वाचा आजचे राशीभविष्य

राशीभविष्य दि. 18 एप्रिल 2018 : या राशींच्या बंद नशिबाची दारे आता उघडणार आहेत, वाचा आजचे राशीभविष्य

मेष

आर्थिक व्यवहारात चांगले योग, नवे वाहन अथवा कोणतेही नवीन काम सुरू करण्यास हरकत नाही, पण तांत्रिक बाबी मात्र पूर्ण तपासून घ्या. कोणत्याही प्रकरणात मध्यस्थीच्यादृष्टीने त्रासदायक योग. आर्थिक बाबतीत यश मिळेल. गुंतवणुकीच्या व्यवहारात सावधानता बाळगल्यास मोठे यश. कोर्टकचेरीच्या संदर्भातील कामांना गती मिळेल.

वृषभ

घर, दुकान, फ्लॅट व जागेसंदर्भात चालू असलेल्या कटकटी मिटतील. वैवाहिक जीवनात शुभ घटनांचे नवे पर्व सुरू होईल. भाडेकरू व घरमालक यांच्यातील कटू प्रसंग संपतील. पण कर्जाचा तगादा लावणारी पत्रे, फोन व संदेश यापासून जपावे लागेल. प्रवास,धनलाभ व महत्त्वाच्या व्यवहारात यश मिळेल.

मिथुन

दुसऱयावर अवलंबून राहिल्याने महत्त्वाची कामे खोळंबतील. मनस्वास्थ्य ठीक राहणार नाही. सांसारिक जीवनात काळजी घ्यावी. एखादे वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल. पण त्याचा गवगवा करू नका, अन्यथा नको तो गहजब होईल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. विवाह झालेला असेल तर पूर्वीच्या आठवणींना उजाळा देऊ नका. वाढत्या खर्चामुळे देणी रेंगाळतील.

कर्क

नोकरी व्यवसाय क्षेत्रात आमूलाग्र फेरबदल होतील. देण्याघेण्याच्या बाबतीत सावधपूर्वक पावले उचला. कर्जप्राप्तीसाठी प्रयत्न केला असाल तर काम होईल. पोटाच्या विकारामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शत्रुच्या कारवायावर लक्ष ठेवावे, नोकरी व्यवसायात चांगल्या महत्त्वाच्या घटना घडतील. पण मतभेद टाळावेत.

सिंह

एखाद्याला विष पण तेच दुसऱयाचे अमृत ठरू शकते. काही गरजवंतांच्या अडचणी तुम्हाला फायदेशीर ठरतील. वास्तुसंदर्भात महत्त्वाच्या घटना. नोकराचाकरांचा अति मानसन्मान महागात पडेल. मोबाईल व तत्सम वस्तू इतरांना देताना काळजी घ्या. कौटुंबिक प्रश्नात हस्तक्षेप केल्याने काही जणांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. चुकीच्या निर्णयामुळे विलंबाने यश.

कन्या

बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करा. योग्य निर्णय घेऊन जे कराल ते काम यशस्वी होईल. कितीही अडचणी आल्या तरी कुणावर विसंबून राहू नका. मुलाबाळांच्या वागण्यामुळे सुखसमाधान राहणार नाही. काही जणांच्या बाबतीत कठोर व्हावे लागेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात असाल तर जरा जपून रहा. क्षुल्लकशी चुकदेखील अडचणीत आणू शकेल.

तुळ

वैवाहिक बाबतीत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना दहावेळा विचार करा. विशेषत: प्रेमप्रकरणे असतील तर जरा काळजी घ्यावी. असलेल्या कामात नवीन काहीही भर घालू नका. कोणत्याही बाबतीत अती ताण घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. निष्कारण महागडे उपचार करून घेऊ नका.

वृश्चिक

घराण्यातील पितर शांत असतील तर ते कुणाच्या रुपाने तुमचा भाग्योदय करतील सांगता येणार नाही. या आठवडय़ात याचा अनुभव येईल. हौसेने केलेले एखादे काम मोठे लाभदायक ठरेल. संततीप्राप्तीचे चांगले योग. गुरुबळ नसले तरीसुद्धा विवाह कार्याच्या वाटाघाटीत उत्तम यश मिळेल. पण व्यवहारी वृत्ती ठेवूनच वागा.

धनु

गुरु कृपा असल्याने आर्थिक लाभ चांगले होत राहतील. पण बेसावध अवस्थेत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. पुढे त्रास होऊ शकतो. मंत्र, तंत्र व करणीबाधा अशा अघोरी प्रकारापासून जपावे लागेल. घाईगडबडीत किंमती वस्तू खरेदी करू नका. फसवणूक होईल. अथवा जादा रक्कम देऊन बसाल.

मकर

हर्षल, रवि चुतर्थात असल्याने घरगुती समस्या उफाळून वर येतील. कुणीतरी त्याचा गैरवापरही करू शकतात. काळजी घ्या. आर्थिक समस्या मिटतील. हाती घेतलेले काम व मैत्री संबंध दोन्हीही सांभाळावी लागतील. संततीच्या बाबतीत महत्त्वाच्या घटना घडतील.

कुंभ

अत्यंत महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य द्या, म्हणजे कामे अडणार नाहीत. अनोळख्या व्यक्तीशी आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. मतभेद मिटविण्यास उत्तम. वास्तू, घर, जागा, दुकान, वाहन वगैरे बाबतीत अनुकूल योग दिसतात, पण शनि, मंगळ युती असल्याने दुर्घटनेचे भय.

मीन

कर्जफेडीसाठी प्रयत्न करा, योग्य मार्ग मिळेल. व्यावहारिक राहून परिस्थिती हाताळा म्हणजे मोठी कामे होतील. नवे स्नेहसंबंध, आर्थिक सुधारणा, प्रवासासाठी अनुकूल आहे. दैवी कृपेचा लाभही होईल. धार्मिक कृत्याकडे लक्ष द्या. त्याचा फायदा होईल. शनि, मंगळ योगामुळे नोकरी व्यवसाय सोडण्याची वेळ येईल. काळजी घ्या.


Show More

Related Articles

Back to top button