Weekly Horoscope, Saptahik Rashifal 19 – 25 September 2022: येथे आपण तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील, पाहू साप्ताहिक राशीभविष्य मध्ये.
तूळ: हा आठवडा तुला राशीच्या लोकांसाठी काही बाबतीत खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नोकरीतही खुशखबरी मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित पडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित असलेल्या वादात यश मिळू शकते.
साप्ताहिक राशिभविष्य 19 ते 25 September 2022
वृश्चिक: या आठवड्यात तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा दबाव तुमच्यावर येण्याची शक्यता आहे. संयम बाळगा आणि संयमाने तुमची जबाबदारी पार पाडा. मुलाच्या तब्येतीची काळजी असू शकते. लांबचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. या प्रवासातून पैसेही मिळू शकतात. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर घाईगडबड टाळा. संयम धरा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.
धनु: वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा तुमच्या राशीसाठी चांगला जाणार आहे. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मोठ्या प्रमाणात बाहेर येण्यात यश मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही पुढील भविष्याची रूपरेषा देखील बनवू शकता.
मकर: या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळू शकते. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहणार आहे. जे नोकऱ्या करतात, ते त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळवू शकतात. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. या आठवड्यात कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत करू शकता. तुमच्या लाइफ पार्टनरला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
कुंभ: हा आठवडा कुंभ राशीसाठी काही आव्हाने घेऊन येत आहे, पण घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या आव्हानांवरही मात कराल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर ते गांभीर्याने घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करणे कठीण जाऊ शकते. कडक शिस्तीचे पालन करावे लागेल. तरच तुम्ही ध्येय गाठू शकाल.
मीन: 19 ते 25 सप्टेंबर हा आठवडा तुम्हाला तुमच्या करिअरबाबत सावध राहावे लागेल. तुम्ही नोकरी बदलू शकता. मित्रांचे सहकार्य प्राप्त होईल. कोणतेही काम करताना यश मिळेल. या काळात काळजीपूर्वक आणि समंजसपणे शेअर बाजारात गुंतवणूक करा. जमीन, मालमत्ता इत्यादी मध्ये गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. सासरच्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे.