Vakri Guru 2022 Effect on 3 Zodiac Signs: देवगुरु गुरु (Jupiter) च्या स्थानाला ज्योतिषशास्त्रात (Astrology) अतिशय महत्त्व आहे. गुरू ग्रहाच्या हालचालीचा सर्व 12 राशींवर प्रभाव होतो. देवगुरु बृहस्पती 12 वर्षांनंतर स्वतःच्या मीन राशीत वक्री झाले आहेत. म्हणजेच गुरु ग्रह उलट दिशेने फिरले आहे. ते 23 नोव्हेंबरपर्यंत या राशीत वक्री आहेत. गुरूच्या वक्री होण्याचा प्रभाव या 3 राशींसाठी खूप शुभ असणार आहे. चला पाहू कोणत्या राशींना फायदा होईल.
गुरु वक्री होण्याचा या राशीला फायदा होणार
वृषभ: गुरु ग्रह आपल्या राशीपासून 11व्या भावात वक्री होत आहे. ज्योतिषशास्त्रात या स्थानाला लाभ आणि उत्पन्नाचे स्थान म्हटले जाते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. व्यापाऱ्यांना फायदा होईल. वाहन किंवा मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.
हे पण वाचा: Surya Gochar 2022: अतिशय शक्तिशाली ‘बुधादित्य योग’ या 4 राशीचे भाग्य उघडणार, मोठा धन लाभ होणार
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी वक्री गुरु खूप फायदेशीर असणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत मोठे यश मिळू शकते. मिथुन राशीच्या दहाव्या घरात गुरु ग्रह वक्री होत आहे. गुरूच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते.
हे पण वाचा: Shukra Rashi Parivartan: सूर्या नंतर आता शुक्र बदलणार आपली चाल, पहा मेष ते मीन राशीवर काय परीणाम होणार
कर्क: गुरू वक्री असल्यामुळे नशिबाची साथ मिळेल. या दरम्यान तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल.प्रवासाचा लाभ मिळेल. शिक्षणाशी संबंधित लोकांना फायदा होईल.व्यापाऱ्यांना फायदा होईल.