Shukra Mahadasha: ज्योतिषशास्त्रा (Astrology) नुसार ग्रहांचा मानवी जीवनावर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव पडतो. ग्रहांमध्ये शुक्र ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक सुख, विलास, संपत्ती, वैभव, कला, प्रतिभा, सौंदर्य, प्रणय आणि ऐश्वर्य यांचा कारक ग्रह मानला जातो.
शुक्राच्या महादशाचा प्रभाव जास्तीत जास्त 20 वर्षे टिकतो. कुंडलीत नीच स्थानावर असल्यास नकारात्मक म्हणजेच अशुभ प्रभाव असतो, तर उच्च स्थानावर असल्यास शुभ प्रभाव पडतो.
शुक्र महादशाचा जीवनावर होणारा परिणाम
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी शुक्राच्या महादशेला सामोरे जावेच लागते. शुक्राच्या महादशेचा परिणाम व्यक्तीच्या कुंडलीतील स्थानावर अवलंबून असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह अशुभ (नीच) स्थितीत असेल तर त्याचा वाईट परिणाम होतो. नीच शुक्रामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संकटांना सामोरे जावे लागते. कमजोर शुक्रामुळे व्यक्तीला भौतिक सुखांची कमतरता भासते. त्यांची लैं’गिक शक्ती कमकुवत असते. महिलांमध्ये गर्भपात होऊ शकतो. मूत्रपिंड आणि डोळ्यांचे आजार होतात.
शुक्र दोषापासून सुटका करण्याचे उपाय
शुक्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शुक्र ग्रहाच्या मंत्राचा जप दररोज किमान १०८ वेळा करावा.
शुक्रदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी गरजू ब्राह्मणाला दूध, दही, तूप, कापूर, पांढरी फुले आणि पांढरे मोती दान करा.
प्रत्येक शुक्रवारी व्रत ठेवून सकाळी माँ लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर खीर बनवून ती लहान मुलींना वाटावी.
रोज सकाळी आंघोळ करून लक्ष्मीची पूजा करा, त्यानंतर पांढर्या गाईला पिठाची भाकरी खाऊ घाला.
दर शुक्रवारी पिठात साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घाला.