Venus Transit in Pisces 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह गोचर होण्याचा प्रभाव होतो. जेव्हा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांच्या आयुष्यावर होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार 15 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्र ग्रह मीन राशी मध्ये प्रवेश करणार आहेत आणि या मीन राशी मध्ये 12 मार्च पर्यंत राहतील. ज्योतिष शास्त्र मानते कि शुक्र ग्रह भौतिक सुख देणारा ग्रह आहे.

मीन राशी मध्ये जेव्हा शुक्र उच्च स्थानी असतात तेव्हा शुभ फल प्राप्ती होते. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी राहणार आहे. Meen Shukra Gochar 2023.
कर्क राशी : ज्योतिष शास्त्रा नुसार शुक्र गोचर (Shukra Gochar) कर्क राशीच्या भाग्य भावात होणार आहे. कर्क राशीत अगोदरच गुरु ग्रह विराजमान आहे त्यामुळे या राशीचे भाग्य साथ देईल. कर्क राशीच्या लोकांच्या समस्या कमी होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ समाचार मिळू शकतो.
सिंह राशी : शुक्र मीन राशी मध्ये प्रवेश केल्याने ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांना धन लाभ होईल. तुम्हाला अपेक्षा नसताना देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात धन लाभ होईल. याच सोबत पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. शुक्र गोचर सिंह राशीची आर्थिक स्थिती बळकट करेल.
कन्या राशी : ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर (Shukra Gochar) विशेष लाभदायी ठरणार आहे. या काळात कन्या राशीच्या जातकाच्या व्यवसायात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कुठेतरी प्रवासाला जाण्याची योजना बनू शकते. नोकरीत बढतीची शक्यता आहे. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुमच्याकडे लोक आकर्षित होतील.
कुंभ राशी : ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांच्या करिअरसाठी हा काळ उत्तम आहे. प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीत लाभ होईल. बँक बॅलन्समध्ये वृद्धी होईल. या काळात घरात कोणाचे लग्न किंवा फंक्शन होऊ शकते. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मीन राशी : मीन राशीत शुक्राचे गोचर होणार आहे. अशा परिस्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वृद्धीचा मार्ग खुला होईल आणि व्यवसायाचा विस्तार करण्यात यश मिळेल. जर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.