Shani Dev , Shani Transit 2022, Shani Vakri 2022, Saturn Retrograde 2022: शनि 5 जून 2022 रोजी पहाटे 3:16 वाजता वक्री अवस्थेत आला आहे. म्हणजेच शनीची उलटी चाल सुरू झाली आहे. कुंभ राशीमध्ये शनि वक्री आहे.
कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. पण ज्या राशीत शनीची राशी बदलेल ती सुद्धा शनीचीच राशी आहे. वक्री अवस्थेत, शनी मकर राशीत प्रवेश करेल. शनीचा हा राशी बदल कधी होतो आणि त्याचा कोणत्या राशींवर काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया.
शनि राशि परिवर्तन 2022 (Shani Transit 2022)
पंचांगानुसार, 12 जुलै 2022 रोजी सकाळी 10.28 वाजता शनी मकर राशीत गोचर करेल. शनि या राशीत वक्री अवस्थेत गोचर करेल.
शनि मार्गी 2022 (Shani Vakri 2022)
हिंदू कॅलेंडरनुसार, 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनी मकर राशीत मार्गी होईल. ज्योतिषशास्त्रात शनीच्या मार्गी होण्यास विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मार्गी झाल्या नंतर शनि पुन्हा सरळ चालीत येतो.
मेष – शनीच्या राशी बदलामुळे तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायात काही चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. या संधींचा लाभ घेण्याची तयारी ठेवावी लागेल.
तुम्हाला पैतृक संपत्तीचा लाभही मिळू शकतो. कोणत्याही वादावर तोडगा काढण्यास मदत होऊ शकते. नोकरी बदलायची असेल तर त्यासाठीही संधी निर्माण होतील.
मिथुन – शनीच्या राशीतील बदलामुळे तुमच्या क्षमता वाढतील. तुमचे ध्येय साध्य करण्यात यश मिळू शकते. या काळात नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. तुमच्या प्रतिभेने लोक प्रभावित होतील.
धार्मिक कार्यात रस घ्याल. या काळात तुम्हाला पैशाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. मोठ्या भांडवलाची गुंतवणूक शहाणपणाने करावी लागेल. संबंध दृढ करण्यासाठीही प्रयत्न करावे लागतील.
तूळ – शनीचे संक्रमण काही बाबतीत तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या दरम्यान जुन्या योजना पुन्हा सुरू करता येतील. यासोबतच जमीन, घर आदी खरेदी करायची असेल तर त्यासाठी संधी निर्माण होणार आहेत.
या दरम्यान शनि तुम्हाला तुमच्या घराचे सुख देखील देऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कोणताही आजार हलकासा घेऊ नका. त्रास होऊ शकतो.