Breaking News

राहु-केतु मुळे कुंडली मध्ये बनतो हा खतरनाक योग, कसे वाचता येईल जाणून घ्या

जेव्हा कुंडली मध्ये राहू आणि केतू यांच्या मध्ये सर्व ग्रह येतात तेव्हा कुंडली मध्ये कालसर्प योग बनतो. यांच्या प्रभावामुळे व्यक्तीला मानसिक कष्ट सहन करावे लागतात. त्याच सोबत व्यक्तीला इतर समस्या होतात.

राहू आणि केतु हे दोघेही पापी ग्रह आहेत. इतर ग्रहांसारखे त्यांचे वास्तव स्वरूप नाही. म्हणून त्यांना ज्योतिष शास्त्रात छाया ग्रह म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू-केतूशी संबंधित दोष असल्यास अशा लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हे दोन्ही ग्रह कुंडलीत कालसर्प योग बनवतात, ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो.

कालसर्प योग म्हणजे काय?

जेव्हा सर्व ग्रह कुंडलीत राहू व केतू यांच्या मध्ये येतात, तेव्हा जन्मपत्रिकेत कालसर्प योग तयार होतो. कालसर्प योग दोन शब्द एकत्र करून बनला आहे. त्यातील पहिला शब्द म्हणजे काल, म्हणजे मृत्यू आणि दुसरा शब्द सर्प ज्याचा अर्थ साप आहे. जन्मपत्रिकेमध्ये कालसर्प योगाच्या परिणामामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासह लोकांना इतरही अनेक समस्या होत असतात.

कालसर्प योग चे प्रकार

 • अनंत कालसर्प योग
 • कुलिक कालसर्प योग
 • वासुकी कालसर्प योग
 • शंखपाल कालसर्प योग
 • पद्म कालसर्प योग
 • महापदम कालसर्प योग
 • तक्षक कालसर्प योग
 • कर्कोटक कालसर्प योग
 • शंखनाद कालसर्प योग
 • पातक कालसर्प योग
 • विषधर कालसर्प योग
 • शेषनाग कालसर्प योग

अश्या प्रकारे मिळतात कालसर्प योग चे संकेत

मानसिक आणि शारिरीक त्रास, वडिलोपार्जित संपत्ती नष्ट होणे, भावंडांकडून विश्वासघात, मुलांकडून त्रास, शत्रूंपासून सतत भीती, वाईट स्वप्ने आणि निद्रानाश, कोर्ट कचेरीचा सामना वरील सर्व परिस्थिती कालसर्प योगाचे परिणाम दर्शवितात.

कालसर्प योगापासून मुक्तीचा उपाय

काल सर्प योग दूर करण्यासाठी व्यक्तीला शिव मंदिरात सोने, चांदी, तांबे, पितळ धातूपासून बनविलेले नाग-नागीण च्या जोडप्याला दान केले पाहिजे. भगवान शंकरांचा विशेष अभिषेक करावा. रूद्राभिषेक करून नऊ प्रकारच्या नागाच्या प्रतिमा बनवून त्यांना नदीत प्रवाहित केले पाहिजे. नाग प्रवाहित केल्यानंतर स्नान केले पाहिजे. आपण परिधान केलेले कपडे सोडून द्यावे. नवीन वस्त्र परिधान करावे. नाग स्तोत्र वाचन केले पाहिजे.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.