Budh Gochar In Kumbh 2023 : 27 फेब्रुवारी 2023 रोजी बुध कुंभ राशीत गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) कोणत्याही ग्रहाचे गोचर सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करते. बुध कोणत्याही राशीत सुमारे एक महिना राहतो आणि नंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. बुध हा व्यापार आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो. अनेक राशींना शनीच्या राशीत बुधाच्या गोचर होण्यामुळे विशेष लाभ मिळणार आहेत.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 1 मार्च रोजी बुध कुंभ राशीत अस्त करेल. या दरम्यान, काही राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव दिसतील. अशा स्थितीत कोणत्या राशींवर त्याचा शुभ प्रभाव पडेल जाणून घेऊ या. या राशीच्या लोकांना पैसा मिळण्याची आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच कुंडलीतील बुधाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात.
मेष-
ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीतील बुधाचे गोचर (Budh Gochar) मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या राशीच्या ११व्या घरात बुध प्रवेश करणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला मानला जातो. इतकेच नाही तर जे लोक कठोर परिश्रम करतात त्यांना या काळात शुभ फळ मिळतील. प्रेम जीवनात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उपाय- मेष राशीच्या लोकांनी पुढील एक महिना भगवान विष्णूच्या श्री वामन स्वरूपाची पूजा करावी. फायदा होईल.
वृषभ-
बुध वृषभ राशीच्या 10व्या भावात प्रवेश करणार आहे. यामुळे तुमच्या कामात स्थिरता येईल. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील. समाजातही तुम्हाला चांगली प्रतिष्ठा मिळेल. दुसरीकडे एक महिना बुधाशी संबंधित उपाय केल्यास अधिक फळ मिळेल.
उपाय- या काळात गाईला शक्यतो हिरवा चारा द्यावा. नियमितपणे शक्य नसेल तर दर बुधवारी हे काम करा.
सिंह-
ज्योतिष शास्त्रानुसार बुध सिंह राशीच्या 7 व्या भावात प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. त्याच वेळी, या कालावधीत कोणताही नवीन व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. या दरम्यान कौटुंबिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या प्रकरणात, बोलताना खूप काळजी घ्या.
उपाय- बुधवारी श्री गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा.