Business Idea: जर तुम्ही नोकरीव्यतिरिक्त उत्पन्नाच्या शोधात असाल तर तुमच्या कौशल्यानुसार तुम्ही दरमहा लाखो रुपये सहज कमवू शकता. अशाच काही कल्पना आम्ही तुम्हाला सुचवत आहोत.
कमी बजेटमध्ये तुमचा व्यवसाय सुरू करा
घर सजावट, खेळणी, वॉल पेंटिंग किंवा सणासुदीच्या रांगोळीला हल्ली खूप मागणी आहे. कमी बजेटमध्ये हा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. कमी खर्चात हे व्यवसाय सुरू करून यशा झेंडा फडकवता येतो.
वॉल पेंटिंग व्यवसाय
आजकाल सगळीकडे कुठल्या ना कुठल्या रुपाने सजावट केली जाते. प्रत्येकाला सजावट देखील आवडते. जर तुम्हाला वॉल पेंटिंगमध्ये रस असेल तर तुम्ही येथे तुमचे नशीब आजमावू शकता. आजकाल प्रत्येकाला घर, दुकान, ऑफिसमध्ये पेंटिंग करायला आवडते. तुम्ही तुमचे मार्केटिंग इंटरनेटद्वारेही करू शकता. यामध्ये चांगला नफा मिळू शकतो.
खेळण्यांचा व्यवसाय
आज खेळणी व्यवसायाची मागणी झपाट्याने वाढत आहे. लोकांनाही मुलांना खेळणी भेट म्हणून द्यायला आवडतात. याशिवाय, हल्ली लोक त्यांच्या घरात सजावटीसाठी खेळणी वापरतात. या स्थितीत हे अगदी कमी बजेटमध्ये सुरू करता येईल. तुमचा हा बिजनेस ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुध्दा सुरू करू शकता.
रांगोळी व्यवसाय
सण किंवा इतर वेळीही रांगोळीला खूप महत्त्व असते. दिवाळीसारखे अनेक सण रांगोळीशिवाय बेरंग होतात. दिवाळीत रांगोळीची मागणी वाढते. अशा परिस्थितीत रांगोळीचा व्यवसाय करून तुम्ही नफाही कमवू शकता.
यामध्ये तुम्ही रांगोळीचे रंग मोठ्या प्रमाणात आणू शकता किंवा काही छापील रांगोळ्या आणू शकता आणि त्या तुमच्या दुकानात विकू शकता आणि अतिरिक्त नफा मिळवू शकता.