Breaking News

17 गाईचे 3 मुलांमध्ये कशी वाटणी झाली, जाणून घ्या…

एक वृद्ध व्यक्ती दुधाचा व्यवसाय करत होता. त्याच्या जवळ एकूण 17 गाई होत्या. म्हातारपणामुळे त्या व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या पश्चात त्याला 3 मुले होते. मुलांमध्ये वाटणी हिस्स्यावरून वाद होऊ नयेत म्हणून त्याने मृत्युपत्र करून ठेवले होते.

या मृत्युपत्रानुसार त्याने तीन मुलांमध्ये 17 गाईची वाटणी केली होती. या वाटणी अनुसार पहिल्या मुलाला 1/2 वाटणी दुसऱ्या मुलाला 1/3 आणि सर्वात लहान तिसऱ्या मुलाला 1/9 वाटणी देण्यात यावी असे लिहिले होते. तसेच या मृत्युपत्रात त्याने नमूद केले कि वाटणी करताना गाईला मारू नये किंवा अर्धी अर्धी वाटू नये.

वडिलांच्या इच्छे अनुसार मुले देखील वाटणी करून घेण्यास तयार होते त्यामध्ये कोणताही बदल होऊ नये आणि त्यांच्या मृत्यूपत्रा पेक्षा कमी किंवा जास्त कोणासही वाटणी मिळवण्याची इच्छा नव्हती.

परंतु या मध्ये एक समस्या निर्माण झाली पहिल्या मुलाला 1/2 वाटणी देण्यात यावी असे नमूद होते त्यानुसार 17 गाईचा अर्धा हिस्सा साडे आठ गाई होतात पण मृत्यूपत्रा नुसार अर्धी गाय करता येणार नव्हती.

याच प्रमाणे दुसऱ्या मुलाला 1/3 वाटणी मिळणार होती त्यानुसार 17 गाईचा तिसरा हिस्सा साडे पाच होतात त्यामुळे पुन्हा तीच समस्या निर्माण झाली मृत्यूपत्रा नुसार अर्धी गाय करता येणार नव्हती.

वरील दोन्ही मुलांच्या समस्या प्रमाणेच तिसऱ्या मुलाच्या वाटणी मध्ये देखील 1/9 अशी वाटणी द्यायची होती त्यानुसार तिसऱ्या मुलाला 1.88 गाय द्यायची होती त्यामुळे या मध्ये देखील अडचण निर्माण झाली.

या वाटणीची समस्या सोडवण्यासाठी तीनही मुलांनी गावच्या पंचांची मदत घेण्याचे ठरवले परंतु वरील समस्या सोडवण्यात पंच देखील अयशस्वी ठरले कारण गाय अर्धी वाटणी करायची नव्हती आणि मृत्युपत्रा पेक्षा कोणत्याही मुलाला कमी किंवा जास्त गाय वाटप नको होती.

अखेर तीनही मुलांनी ही समस्या सोडवण्यासाठी बक्षीस जाहीर केले. त्यानुसार एका विद्वान व्यक्तीने ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.

या विद्वान व्यक्तीने तीनही मुलांना सांगितले कि तुमच्या एकूण 17 गाई आहेत त्यामध्ये मी माझ्या कडची एक गाय तुम्हाला देतो त्यानंतर आपण तुमच्या वडिलांनी ठरवल्या प्रमाणे वाटणी करू. यास तिन्ही मुले तयार झाले.

त्यानुसार 17 गाय आणि विद्वानाची एक गाय यानुसार एकूण 18 गाय झाल्या त्यानुसार पहिल्या मुलाला 18/2 म्हणजेच 9 गाई मिळाल्या. दुसऱ्या मुलाला 18/3 म्हणजेच 6 गाय आणि तिसऱ्या मुलाला 18/9 म्हणजेच 2 गाय मिळाल्या म्हणजेच एकूण 9+6+2 = 17 गाईची वाटणी झाली आणि तरीही एक गाय शिल्लक राहिली जी गाय विद्वानाची होती जी त्याने पुन्हा आपल्या घरी परत नेहली.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.