Breaking News

धन समृद्धी मिळवण्यासाठी आवश्य वापरून पहा कापूर चे सोप्पे उपाय…

हिंदू धर्मा मध्ये कापूर पूजेच्या साहित्या मध्ये वापरला जातो. कापूर पूजे मध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या वस्तू पैकी एक आहे. तसे तर कापूर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतो पण ज्योतिष मध्ये देखील यास उपयोगी मानले आहे.

कापूरचा वापर पूजे व्यतिरिक्त इतर प्रभावी आणि चमत्कारिक उपायासाठी देखील केला जातो. जे आपली धन समृद्धी संबंधीच्या समस्या पासून सुटका मिळवून देऊ शकतो. चला तर जाणून घेऊ कापूर चे काही खास उपाय.

शास्त्रा अनुसार देवी-देवतां कडून विशेष पुण्य प्राप्ती साठी दररोज सकाळ-संध्याकाळ आरती मध्ये कापूर वापरला पाहिजे. असे केल्याने अक्षय (कधीही न संपणारे) पुण्य प्राप्ती होते.

कापूरच्या वापराने पितृदोष आणि कालसर्प दोष या पासून मुक्ती मिळते. या दोषांना दूर करण्यासाठी आपण कापूर तुपा मध्ये भिजवून सकाळ आणि संध्याकाळ तसेच रात्री देखील जाळावे. याच सोबत घरातील शौचालय आणि बाथरूम मध्ये देखील कापूर वड्या ठेवा. असे केल्याने घराचा वास्तू दोष देखील दूर होईल.

अचानक घटना किंवा दुर्घटना यांचे कारण राहू-केतू आणि शनी असतात. रात्री हनुमान चालीसा वाचल्या नंतर कापूर लावून आरती आवश्य केली पाहिजे. असे केल्याने आपण अचानक दुर्घटना पासून वाचू शकतो. तसे झोपण्या अगोदर कापूर जाळणे फायदेशीर मानले जाते. यांच्या धुरामुळे डास दूर पळतात.

ज्योतिष अनुसार घराच्या कोणत्याही भागात वास्तुदोष आहे तर त्या जागी कापराच्या दोन वड्या पेटवून ठेवा. जेव्हा ते संपतील तेव्हा अजून एक वडी ठेवून द्यावी त्यास पेटवू नये. असे केल्याने वास्तुदोष पासून सुटका मिळू शकते.

ज्योतिषशास्त्र अनुसार धन-धान्यसाठी आपण रोज रात्री स्वयंपाकघराची स्वच्छता करताना चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळले पाहिजे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही वस्तूची कमी होणार नाही. त्याच सोबत आपले उत्पन्न देखील वाढेल.

भाग्य वृद्धीसाठी आपण पाण्यामध्ये कापूरच्या तेलाचे काही थेंब टाकून अंघोळ करावी. यामुळे आपण पूर्ण दिवस ताजेतवाने राहाल. याच सोबत आपले भाग्य जागृत होईल. जर आपल्याला शनी दोष पासून मुक्ती पाहिजे असेल तर त्यासाठी आपण चमेलीच्या तेलाचे काही थेंब टाकावे. हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशी करायचा आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.