Breaking News

या 3 राशी शनी देवा च्या साढ़ेसाती ने त्रस्त झाले आहेत जाणून घ्या कधी यामधून आराम मिळेल

शनिदेव 29 एप्रिल 2020 रोजी कुंभ राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. शनिदेव यांच्या या राशी बदलामुळे काही राशीवर शनीची साढ़ेसाती लागणार आहे. ज्यामुळे त्यांना काही त्रास सहन करावा लागू शकतो.

वास्तविक शनि या वेळी मकर राशीत आहे. 24 जानेवारी 2020 रोजी या राशीत शनिदेव गोचर झाले होते. आता पुढच्या महिन्यात शनि देव मकर राशी सोडून कुंभ राशी मध्ये प्रवेश करणार आहे. सध्या धनु, मकर आणि कुंभ या राशीला साढ़ेसाती सुरु आहे. मिथुन व तुला राशीवर शनिदेवाची ढैय्या आहे.

29 एप्रिल 2020 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करताच धनु राशीची साढ़े साती संपेल. परंतु लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 2022 मध्ये शनी पुन्हा मकर राशी मध्ये वक्री चालीने परत येणार आहेत. शनीच्या मकर राशीत वक्री आणि मार्गी झाल्यामुळे काही काळ धनु राशीला साढ़ेसाती लागेल. जी वर्ष 2023 पर्यंत राहील.

मकर राशीला शनीची साढ़े साती सुरु आहे. जी वर्ष 2025 पर्यंत संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ज्या राशी मध्ये अडीच वर्ष राहतात त्या राशीच्या एक राशीच्या अगोदरची आणि नंतरच्या राशीला साढ़े साती असते. म्हणजेच तीन राशीवर शनीची साढ़े साती अडीच-अडीच वर्ष राहते. शनी मीन राशीत जात असताना मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून आराम मिळेल.

कुंभ राशीवर देखील सध्या साढ़े साती लागली आहे. जी 23 जानेवारी 2028 रोजी पूर्णपणे निघून जाईल. कुंभ राशीचा शनीच्या साढ़े सातीचा पहिला टप्पा चालू आहे. जेव्हा शनि मेष राशीत येईल तेव्हा कुंभ राशीच्या लोकांना त्यातून स्वातंत्र्य मिळेल.

हे उपाय करा, शनि अनुकूल राहील

ज्या राशीला शनीची साढ़े साती सुरु आहे. त्या लोकांनी खाली नमूद केलेल्या उपाययोजना केल्या पाहिजेत. हे उपाय केल्यास त्यांचे आयुष्यावर वाईट परिणाम होणार नाहीत.

शनिवारी शनिदेवची पूजा करावी आणि त्यांना काळे तीळ, मोहरी, मोहरीचे तेल आणि लोखंडी वस्तू अर्पण करा.

शनिवारी काळ्या वस्तू दान करा.

या दिवशी पीपळाच्या झाडाची पूजा करा आणि या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

शनिवारी शनिदेव यांच्या सोबतच हनुमान जीची पूजा करणे चांगले मानले जाते आणि त्यांची पूजा केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. आपण मंदिरात जा आणि भगवान हनुमानाला मोहरीचे तेल अर्पण करावे. त्यानंतर दीप प्रज्वलित करून हनुमान चालीसा वाचा. हा उपाय खूप प्रभावी असल्याचे सिद्ध करतो. तसेच या दिवशीही शिवशंकर यांना जल अर्पण करा.

शनिदेवाची साढ़े साती आपल्यासाठी अनुकूल राहण्यासाठी या काळात आपण कोणाशीही भांडु नये. वडिलधाऱ्यांचा आदर करा. कोणासही दुःख देऊ नये त्रास होईल असे वागू नये.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.