Surya Gochar 2022: अतिशय शक्तिशाली ‘बुधादित्य योग’ या 4 राशीचे भाग्य उघडणार, मोठा धन लाभ होणार

Budhaditya Raj Yog In Horoscope: ज्योतिषशास्त्रा (Astrology) मध्ये सूर्याला ग्रहांचा राजा बोलले जाते. सूर्य हा 30 दिवसात आपली राशी बदलतो. 17 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या (Virgo) राशी मध्ये प्रवेश करत आहे. कन्या राशीत बुध (Mercury Planet) ग्रह आधीच उपस्थित होता. अशातच कन्या राशीमध्ये सूर्य आणि बुधाची युति होत आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतिमुळे बुधादित्य योग तयार होतो. हा बुधादित्य योग (Budhaditya Yog) अतिशय प्रभावी आहे आणि 4 राशींसाठी  अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. चला जाणून घेऊया हा बुद्धादित्य योग कोणत्या राशीचे भाग्य उजळवणार आहे.

बुधादित्‍य योग (Surya Gochar September 2022) या राशींसाठी शुभ

वृषभ: वृषभ (Taurus) राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ आहे. हे तुम्हाला भौतिक सुख देणार आहे. जीवनात सुख आणि सुखाची साधने वाढवणार आहे. मुलांच्या कडून आनंद मिळू शकेल. व्यापाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. म्हणजेच हा काळ जीवनात आनंद आणि आराम वाढवणारा आहे.

सिंह: सूर्य सिंह (Leo) राशीचा स्वामी आहे आणि कन्या राशीत सूर्याच्या गोचर होण्यामुळे तयार झालेला बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम देणारा आहे. सिंह राशीच्या लोकांना भक्कम आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला काही अनपेक्षित मार्गाने पैसे मिळू शकतात. कमाईचे नवीन मार्ग खुले होतील. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता किंवा मोठी ऑर्डर देखील मिळू शकते.

वृश्चिक: बुधादित्य राजयोग वृश्चिक (Scorpio) राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठा लाभ देणार आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात सक्रिय लोकांना मोठ्या पदाची जबाबदारी मिळू शकते. हा काळ प्रभाव आणि आदर वाढवणारा ठरणार आहे.

मकर: बुधादित्य राजयोग आर्थिक बाबतीत मकर (Capricorn) राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. भाग्य पूर्ण साथ देईल. धनलाभ होईल आणि उत्पन्न वाढेल. व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. मोठ्या संस्थेत प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना यामध्ये यश मिळू शकते. नवीन नोकरीही संधी मिळू शकते.

Follow us on

Sharing Is Caring: