health

रात्री कोणत्या कुशीवर ती झोपल्याने आरोग्याला फायदे मिळतात, जाणून घ्या

आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये विविध अवयव असतात त्यामधील काही शरीराच्या उजव्या भागात असतात तर काही डाव्या भागांमध्ये असतात. याचा आपण कधी विचार केला असेल किंवा नसेलही केला. पण आज जो मुद्दा आम्ही येथे सांगत आहो त्यानंतर तुम्ही हा विचार नक्कीच कराल.

तुम्ही कधी विचार केला आहे का रात्री आपण झोपताना कोणत्या कुशीवर झोपल्यास आपल्या आरोग्याला फायदे मिळू शकतात? चला आज आपण याबद्दल अधिक सविस्तर चर्चा करू. खरं तर डाव्या कुशीवर झोपल्याने आपल्याला जास्त फायदे मिळतात त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्यावर कोणते फायदे होतात हे आज आपण येथे पाहू.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपल्या हृदयावर दबाव जाणवत नसल्याने हृदय योग्य पद्धतीने काम करतं. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूपर्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो. याने शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे गर्भवती स्त्रियांसाठी डाव्या कुशीवर झोपणे योग्य आहे कारण याने गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत नाही. याव्यतिरिक्त टाचा, हाता आणि पायांमध्ये सूज येण्याची समस्या दूर होते.

☑ डाव्या कुशीवर झोपल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होत असल्याने झोप पूर्ण होते. या स्थितीत झोपून उठल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतात.

☑ पचन क्रिया सुरळीत होते आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही. डाव्या बाजूकडे झोपल्याने शरीरात जमा होत असलेले टॉक्सिन लसिका वाहिनी तंत्राद्वारे बाहेर पडतात.

☑ बद्धकोष्ठतेची तक्रार असलेल्यांनी डाव्या कुशीवर झोपायला हवे. आराम मिळेल. गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जाते आणि सकाळी सहजपणे पोट स्वच्छ होतं.

☑ पोटातील अॅसिड वर न जाता खाली येतं, ज्याने अॅसिडिटी आणि छातीत जळजळणे अश्या समस्या दूर होतात.


Show More

Related Articles

Back to top button