inspirationPeople

राणी पद्मावती होती तरी कोण?

राणी पद्मिनी किंवा पद्मावती यांचं जीवन सिंहालापासून सुरू झालं होतं. त्यांच्या वडीलांचं नाव गंधार्व्सेना आणि आईचं नाव चम्पावती होते. पद्मावती यांच्या लग्नासाठी वडील गंधार्व्सेना यांनी स्वयंवर आयोजित केला होता. यात अनेक हिंदू राजा आणि राजपूतांनी सहभाग घेतला होता. चित्तोडचे राजा रावल रतन सिंह यांचे आधीच अनेक विवाह झाले असतानाही त्यांनी या स्वयंवरमध्ये येण्याचा निर्णय घेतला. दुसरे राजा मलखान सिंह यांना हरवून राजा रावल रतन यांनी स्वयंवर जिंकला.

१३०२-१३०३ या काळात राजपूत राजा रावल रतन सिंह यांचं राज्य चित्तोडमध्ये होतं. ते सिसोदिया राजवंशाचे होते आणि राणी पदमावती यांच्याआधी त्यांच्या १३ पत्नी होत्या. ते एक पराक्रमी योद्धा होते. राणी पद्मावतींवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा लग्नही केलं नाही. ते एक चांगले शासक होते. नेहमीच त्यांनी आपल्या प्रजेच्या भल्याचा विचार केला होता.

असे म्हणतात की, त्यांच्या दरबारात एक संगीतकार होता. ज्याचं नाव राघव चेतन होतं. सर्वांनाच हे माहिती होतं की, तो एक संगीतकार आहे. यासोबतच तो जादूटोणाही करत असल्याची माहिती आहे. तो स्पर्धकांना हरवण्यासाठी जादूटोना करायचा. असंच काहीतरी करताना तो रंगेहाथ पकडला गेला आणि राजा रावल सिंह याला हे अजिबात पसंत पडलं नाही. राजाने त्याची गाढवावर बसवून धिंड काढली. त्यानंतर तो संगीतकार राज्य सोडून गेला पण त्याने राजाचा बदला घेण्याचे ठरवले.

तेथून गेल्यावर राघव चेतन हा दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीजवळ गेला आणि त्याने खिलजीला भडकवले. राणी पद्मावतीचं सौंदर्य त्याला सांगून चित्तोडवर आक्रमण करण्यास सांगितले. राणी पद्मावतीला मिळवण्याची लालसा सोबत घेऊन खिलजी राजा रावल सिंहच्या राज्यात गेला. त्याने राणी पद्मावतीला बघण्याची अट घातली. पण महिलांना असे सर्वांसमोर चेहरा दाखवण्यावर बंदी होती.

तेव्हा यातून मार्ग काढला गेला. एकदा केवळ पद्मावतीचे मुखदर्शन व्हावे असा खलिता पाठविला. यावर रतनसिंह यांनी सहमती दर्शवली. मात्र, एखाद्या परपुरुषासमोर आपला चेहरा दाखवणं हा राजपुतांसाठी अपमान होता. तरीही युद्ध आणि रक्तपात टाळण्यासाठी पद्मावती राजी झाली. पण फक्त आरशाद्वारे मुखदर्शनाची अट तिने घातली.

राणी पद्मावतीचं सौंदर्य पाहून खिलजी वेडापिसा होतो. त्यानंतर तो काही सैनिकांच्या जोरावर राजा नवल सिंह याला आपल्यासोबत घेऊन जातो. राजाला सोडवण्याच्या बदल्यात तो राणी पद्मावतीला मागणी करतो. आता खिलजीला धडा शिकवण्यासाठी राणीने एक चाल खेळली. त्यांनी शरण येण्याची तयारी दाखवली पण एक अट ठेवली. ती म्हणजे ७०० दासी सोबत घेऊन येण्याची अट. खिलजीही यासाठी तयार झाला.

दुस-या दिवशी पालख्या येताना पाहून खिलजी खूष झाला. पण पद्मावतीने ७०० दासींऐवजी पालखीमध्ये चित्तोडच्या ताकदवर सैनिकांना त्या पालख्यांमध्ये पाठवले. सैनिकांनी खिलजीच्या छावणीवर हल्ला चढवला आणि राजा रतन सिंह यांची सुटका केली. या अपमानाने खिलजी चवताळला. आणि त्याने चित्तोडवर आक्रमण केलं. या युद्धात राजा रतनसिंह यांचाही मृत्यू झाला. चित्तोडचा अभेद्य किल्ला मुघलांनी भेदला.

युद्धात हार झाल्याचं ऐकून राणी पद्मावतीने किल्ल्याच्या आतमध्ये एक मोठी चिता जाळण्यास सांगितलं. खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी तिने चितेत उडीत घेण्याचा निर्णय़ घेतला. स्त्रियांना बंदी बनवण्यास खिलजीने किल्ल्यात प्रवेश करताच राणी पद्मावती यांच्यासह जवळपास १६ हजार महिलांनी सामूहिक चितेमध्ये उडी घेतली यालाच राजस्थानमध्ये जोहार म्हणतात.


Show More

Related Articles

Back to top button