महेंद्र सिंह धोनी करू शकतो नव्या इंनिगची सुरुवात, मैदानात देखील दिसू शकते एक झलक

0
18

वल्ड कप झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर दिसणारा महेंद्र सिंह धोनी आता एका नव्या अंदाजात दिसून येणार आहे. होय, धोनीचा एक नवा चेहरा आपल्या समोर लवकरच येणार आहे, ज्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या परवानगीची गरज आहे.

याबद्दल गांगुली सोबत चर्चा झाली आहे आणि लवकरच धोनी एका नव्या अंदाजात आपल्याला पाहण्यास मिळू शकेल जो यापूर्वी कधी आपण पाहिला नाही. धोनीचे फैन्स त्याच्या या नव्या इंनिगची मोठ्या उत्साहाने प्रतीक्षा करत आहेत.

या महिन्या मध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्या मध्ये पहिली डे नाइट टेस्ट होणार आहे. ज्या बद्दल खेळाडू देखील उत्साहित आहेत. त्याच संदर्भात स्टार स्पोर्ट्स ने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली कडे एक प्रस्ताव पाठवला आहे. ज्यामध्ये त्यांनी ही ऐतिहासिक टेस्ट अविस्मरणीय बनवण्यासाठी भारताच्या माजी कैप्टन्सना कमेंट्री बॉक्स मध्ये बोलावू इच्छिते आणि याबद्दल गांगुलीला निर्णय घ्यायचा आहे.

स्टार स्पोर्ट्स कडून महेंद्र सिंह धोनीला कमेट्री करण्यासाठी आमंत्रित केले आहे. असे पहिल्यांदाच होईल जेव्हा महेंद्र सिंह धोनी कमेंट्री करताना दिसून येईल. बीसीसीआय अध्यक्ष गांगुली ने डे नाइट मैच चा प्रस्ताव ठेवला ज्यास कोहली ने वेळ न दवडता लगेच होकार दिला. ज्यामुळे आता ऐतिहासिक डे नाइट टेस्ट मैच खेळवली जाणार आहे.