मराठी कलाकार देणार पुरग्रसतांना मदतीचा हात

सांगली, सातारा आणि कोल्हापूर मध्ये पुराने धुमाकूळ घातला आहे. या पुरामध्ये अनेक संसार उघड्यावर आले. या कठीण प्रसंगी पूरग्रस्तांना अनेक ठिकाणाहून मदत मिळत आहे. अशीच मदतीची घोषणा अभिनेता सुबोध भावे यांनी देखील केली आहे. त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगातून उभी होणारी रक्कम पुरग्रस्ताच्या मदतीसाठी देणार आहोत असे सांगितले आहे.

सुबोध भावे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले कि 15 ऑगस्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे होणाऱ्या प्रयोगाचे उत्पन्न सांगली, कोल्हापूर येथे पुराचा फटका बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केले.

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराचा फटका बसलेल्या लोकांना आता अनेक संस्था मदतीचा हात पुढे देत आहे. यामध्ये श्री सिद्धिविनायक न्यास तर्फे सांगली, कोल्हापूर इत्यादी भागातील रहिवाश्याना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. येथे ट्रकच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर सांगत होते.

आपल्या माहितीसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने देखील पुरग्रसतांना मदत करण्याचे आवाहन केलेले आहे.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर मध्ये पुराने धुमाकूळ घातला आहे. या पुरामध्ये अनेक संसार उघड्यावर आले. या कठीण प्रसंगी पूरग्रस्तांना अनेक ठिकाणाहून मदत मिळत आहे. अशीच मदतीची घोषणा अभिनेता सुबोध भावे यांनी देखील केली आहे. त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगातून उभी होणारी रक्कम पुरग्रस्ताच्या मदतीसाठी देणार आहोत असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here