horoscope

मंगळवार 30 जुलै : श्री गणेश या 5 राशींवर करतील आपली कृपा

आज मंगळवार 30 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली अध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की, त्यात काहीही वावगे नाही.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

व्यवस्थित व्यायाम करून तुमचे वजन नियंत्रणात आणण्याची गरज आहे. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दु:ख पोहोचवू शकते. पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील ख-या प्रेमाला मुकाल. परंतु चिंता करू नका वेळ येताच प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे जीवनही प्रेमाने भरून जाईल. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे.

कर्क राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

भविष्याची निष्कारण चिंता तुमचा मूड खराब करेल. विनाकारण भविष्याची चिंता करण्यात वेळ घालविण्याऐवजी वर्तमानाची मजा घेण्यात खरा आनंद आहे हे पक्कं ध्यानात ठेवा. अंध:कार आणि शांततेचे प्रत्येक क्षण हे स्वत:चे अस्तित्व, आश्चर्य घेऊन वावरत असतात. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. एकतर्फी प्रेमावर वेळ वाया घालवू नका. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही बाबतीत तक्रार करू नका. आज तिचा/त्याचा मूड ठीक नाही. तक्रार केल्याने परिस्थिती अजूनच बिघण्याची शक्यता आहे.

सिंह राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.

कन्या राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

भावाच्या कामात दररोज नाक खूपसून तुम्ही त्याचा रोष ओढवून घ्याल. तुमचा सल्ला नको तिथे नको त्या व्यक्तीला देऊ नका. तुमची सूचना तुमच्याजवळच ठेवा आणि गप्प राहा आणि प्रत्येकाशी प्रामाणिकपणे वागा. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.

तुल राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची शक्यता आहे. म्हणून आताच नियंत्रण करा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. उदार वागणूक ही काही मर्यादेपर्यंत चांगली असते हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मर्यादेच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

धनु राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. तुमचा पारा चढल्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही संकटात पडू शकता. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल.

मकर राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. अनुमान लावून कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा. तुमच्या अतिशय व्यस्त कामकाजाच्या वेळेमुळे प्रणयराधनेस वेळ मिळणार नाही. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला जाणून घ्यायची नव्हती, नेमकी तिच गोष्ट तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला आज सांगण्याची शक्यता आहे.

मीन राशी भविष्य (Tuesday, July 31, 2018)

मनावर झालेल्या आघातामुळे तुम्हाला प्रचंड धैर्य आणि शक्ती पणाला लावावी लागेल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही यावर सहजपणे मात कराल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. शिशिर ऋतुतील पानगळी प्रमाणे आपले प्रेम जीवन असू शकेल. जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करणे कमी केले नाही तर तुम्ही कामाच्या ठिकाणी कदाचित घोडचूक कराल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.


Show More

Related Articles

Back to top button