जर शिवसेने ने भाजपा विरुद्ध हे पाऊल उचलले तर काँग्रेस त्यांना समर्थन देण्या बद्दल विचार करू शकते

राज्यात निवडणूक होऊन त्याचा निकाल देखील लागला आणि यास अनेक दिवस उलटले तरी देखील अजूनही राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर माननीय राज्यपालांनी फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितलं आहे.

सध्या भाजपाला मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या परस्थिती मध्ये भाजपाला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

यावर भाष्य करताना नवाब मलिक म्हणाले कि, जर भाजप सरकार बनवण्याचा दावा करते, तर फ्लोर टेस्टिंग दरम्यान काँग्रेस त्यांच्या विरुद्ध मत करेल. आम्ही लक्ष ठेवू कि शिवसेना सरकार पाडण्यासाठी भाजपा विरुद्ध मत करते का नाही. यानंतर आम्ही शिवसेनाच्या नेतृत्वात वैकल्पिक सरकारचे समर्थन करण्या बद्दल विचार करू.

आपल्या माहितीसाठी राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करून सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु केली आहे. हे अगोदर देखील होऊ शकले असते. राज्यपालांनी आता या गोष्टीला महत्व दिले पाहिजे की भाजपा कडे सरकार बनवण्या एवढे आमदार आहेत किंवा नाही.