Connect with us

गुरुवार 19 जुलै : ग्रह बनवत आहेत दिव्य योग ज्यामुळे या 4 राशींना होणार फायदा

Today's Horoscope

गुरुवार 19 जुलै : ग्रह बनवत आहेत दिव्य योग ज्यामुळे या 4 राशींना होणार फायदा

आज गुरुवार 19 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमच्या गरजा समजून घेणार नाहीत असे तुम्हाला आढळून येईल – म्हणून लोक तुमच्यासाठी बदल करतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वत:त काही बदल करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. अर्धवट, अयोग्य कामात स्वत:ला गुंतवू नका, त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. आजचा दिवस कठीण आहे. त्यामुळे कामाला जाण्यापूर्वीच मन कणखर करा. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी आज विचित्रप्रकारे वागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम सोडू नका.

वृषभ राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा – त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले वाटेल – दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरूवात करा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करुन वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही कीती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका.. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे.

मिथुन राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

कर्क राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात – म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मानसिक ताण वाढेल. म्हणून अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या स्वीकारण्यास शिका. जीवनात त्याचा उपयोग होतो. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. काम करताना सोशल मीडियाचा वापर करणे तुम्हाला संकटात टाकू शकते. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल.

सिंह राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. कामाच्या ठिकाणी कुणीतरी तुमच्याशी गैरवर्तन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार राहा. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.

कन्या राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. रम्य सहली समाधानकारक ठरतील. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

तुल राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका, त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील. अचानक ओळखीतून होणारी जवळीक टाळा, अन्यथा ती पश्चातापाला कारणीभूत ठरु शकते. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही – परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत – तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल – तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. नात्यामध्ये आलेला कडवटपणा घालविण्यासाठी काही वेळा तुम्हाला शांत राहणे आवश्यक असते. आजचा दिवस तुमच्या संयमाची कसोटी पाहणारा ठरणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

धनु राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल.

मकर राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. आपण जर योग्य सल्ल्याशिवाय गुंतवणूक केली असेल तर नुकसान होण्याची शक्यता आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे – तुमच्या मनावर दबाव येईल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका. सुखसमृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. अतिशय क्षुल्लक कारणांवरून शय्यासोबत करणा-या प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध तणावाचे बनतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. कोणत्याही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

मीन राशी भविष्य (Thursday, July 19, 2018)

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तर्कावर आधारित विनोदात आनंद घेऊ नका. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेला चांगला मित्र आज कदाचित त्रास देऊ शकतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top