Hair Care

केसांना तूप लावण्याचे फायदे

केसांना तूप लावण्याचे फायदे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर तुम्ही योग्य आर्टिकल वाचत आहात. याचा वापर नवीन केस येण्यासाठी, केस दाट करण्यासाठी, केस जाड होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून देखील केला जातो.

केसांना तूप लावण्याचे फायदे एवढेच नाहीत तर अजून बरेच आहेत, चला पाहू थोडक्यात माहिती.

केसांना तूप लावण्याचे फायदे

hair dandruff

केसा मध्ये डेंड्रफ

 • जर तुमच्या केसांमध्ये डेंड्रफ आहे तर तुम्ही आपल्या स्केल्प मध्ये घरगुती तूप आणि बादाम तेल लावून मालिश करा.
 • यामुळे डेंड्रफ पासून सुटका मिळेल.
 • याच सोबत स्केल्प मध्ये कोरडी त्वचा किंवा ड्राइनेस असल्यास हि समस्या देखील दूर होईल.

spilt hair care

केसांना फाटे फुटत असल्यास

 • जर तुमच्या केसांना फाटे फुटत असल्याने तुम्ही काळजीत असाल तर घरगुती तूप यावर उपाय आहे
 • तुपाने स्केल्प वर मसाज केल्याने हि समस्या दूर होईल.
 • तूप आपल्या केसांना भरपूर पोषण देते आणि यामुळे फायदा मिळतो.

केस गळणे थांबवणारे उपाय - Hair Fall Tips in Marathi

नवीन केस येण्यासाठी

 • केसांची वाढ कमी आहे, काळजी करू नका. केसांना घरगुती तूप लावून मालिश करा.
 • याच सोबत तुम्ही आवळा आणि कांद्याचा ज्यूस पण यामध्ये मिक्स करू शकता.
 • असे केल्यामुळे तुमचे केस सुंदर होण्या सोबत लांब होतील.
 • नवीन केस येण्यासाठी मदत होईल.
 • केस काळे राहण्यास मदत होईल.

केसांचा गुंता निघून जाईल

 • घरगुती तूप लावल्याने केसांचा गुंता काढण्यासाठी मदत होईल.
 • तुपामध्ये थोडे ओलिव ऑइल मिक्स करा यामुळे गुंता निघण्यास सोप्पे होईल.

केसांची चमक वाढण्यासाठी

 • तुमच्या केसांची नैसर्गिक चमक पुन्हा मिळवण्यासाठी घरगुती तूप थोडेसे गरम करून 20 मिनिट केसांना मालिश करायची आहे.
 • यानंतर केसांमध्ये लिंबाचा रस लावून 10 मिनिट तसेच ठेवा.
 • असे केल्यानंतर केसांना व्यवस्थित थंड पाण्याने धुवून घ्या.

केसांना कंडीशनिंग करण्यासाठी

 • बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या कंडीशनर मध्ये कैमिकाल्स असतात ज्यामुळे केस नाजूक होतात.
 • यासाठी केसांना कंडीशनर करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे केसांना तूप लावून मालिश करणे.

तुम्हाला केसांना तूप लावण्याचे फायदे हा लेख आवडला असेलच.

वर सांगितल्या प्रमाणे नवीन केस येण्यासाठी, केस दाट करण्यासाठी, केस जाड होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून आणि केस चमकदार करण्यासाठी, केसा मध्ये डेंड्रफ, केसातील गुंता काढण्यासाठी असे बरेच केसांना तूप लावण्याचे फायदे मिळतात.


Tags
Show More

Related Articles

Back to top button